Persistent Share Price | पैसाच पैसा! मजबूत परतावा देणारा शेअर, आता स्टॉक स्लिट लाभासह 3200% डिव्हीडंड देणार

Persistent Share Price | पर्सिस्टंट सिस्टम्स कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने आपले शेअर्स स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. यासह पर्सिस्टंट सिस्टम्स कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना एका शेअरवर 32 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. नुकताच कंपनीने लाभांश वाटप करण्याची रेकॉर्ड डेट जाहीर केली. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे.
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पर्सिस्टंट सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी पर्सिस्टंट सिस्टम्स स्टॉक 1.10 टक्के वाढीसह 8,344.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
पर्सिस्टंट सिस्टम्स कंपनीने आपले शेअर 2 तुकड्यात विभाजित करण्याची घोषणा केली आहे. पर्सिस्टंट सिस्टम्स कंपनीने स्टॉक एक्सचेंजला कळवले की, कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स दोन भागात विभाजित करण्याची घोषणा केली आहे. स्टॉक स्प्लिटनंतर शेअर्सचे दर्शनी मूल्य प्रति शेअर 5 रुपये होईल. तरलता वाढवण्यासाठी अनेक कंपन्या आपले शेअर्स विभाजित करत असतात.
पर्सिस्टंट सिस्टम्स कंपनी आपल्या शेअरधारकांना 1 शेअरवर 32 रुपये लाभांश देखील देणार आहे. पर्सिस्टंट सिस्टम्स कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 3200 टक्के लाभांश वाटप करणार आहे. कंपनीने शेअरधारकांना लाभांश वाटप करण्याची रेकॉर्ड डेट म्हणून 30 जानेवारी 2024 हा दिवस निश्चित केला आहे. रेकॉर्ड तारीखच्या दिवशी ज्या गुंतवणूकदारांचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असेल त्यांना कंपनी लाभांशा देईल.
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पर्सिस्टंट सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 8716.65 रुपये आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत पर्सिस्टंट सिस्टम्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 72 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील एका वर्षभरात पर्सिस्टंट सिस्टम्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 79 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 3962.05 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Persistent Share Price NSE Live 24 January 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vedanta Share Price | 600 रुपये टार्गेट प्राईस, वेदांता शेअरमध्ये तेजीचे संकेत, सध्या 437 रुपयांवर ट्रेड करतोय - NSE: VEDL
-
Vedanta Share Price | 560 रुपये टार्गेट प्राईस, प्रभुदास लिलाधर वेदांता शेअर्सवर बुलिश, संधी सोडू नका - NSE: VEDL
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये तेजी, पण स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: RELIANCE
-
IREDA Share Price | टॉप ब्रोकरेज फर्मने दिले संकेत, शेअर प्राईस उसळी घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
-
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट नोट करा - NSE: IREDA
-
Suzlon Share Price | कंपनीला मिळाला नवीन कॉन्ट्रॅक्ट, सुझलॉन शेअर्स तेजीत, अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Suzlon Share Price | स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिले संकेत, BUY रेटिंग सह पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: SUZLON
-
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करतोय, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPC
-
TATA Motors Share Price | मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेजने दिले संकेत, अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | वेदांता शेअरमध्ये तेजी, कंपनीबाबत अपडेट आली, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL