
Stocks To Buy | शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी योग्य असा स्टॉक शोधणे थोडे मेहनतीचे काम आहे. ब्रोकरेज फर्म आपल्या ग्राहकांना आणि स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांना चांगले स्टॉक शोधण्यात खूप मदत करतात. ब्रोकरेज फर्म ICICI डायरेक्ट रिसर्चच्या मते, पर्सिस्टंट सिस्टम्स आणि इंडियन हॉटेल्सच्या शेअर्समध्ये पुढील काळात 13-14 टक्क्यांपर्यंत वाढ पाहायला मिळेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. या कंपनीच्या स्टॉकवर ब्रोकरेज फर्मनी काय अंदाज व्यक्त केला आहे, हे आपण सविस्तर जाणून घेऊ
Persistent Systems :
ब्रोकरेज फर्मच्या मते, “Persistent Systems कंपनी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीनंतर कमाईच्या बाबतीत खूप जबरदस्त कामगिरी करत आहे. कंपनीच्या शेअरची किंमत पुढील काळात 3865 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 3715 ते 3767 रुपयांची खरेदी किंमत सुचवली आहे. Persistent Systems या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 4240 रुपये पर्यंत वाढू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 471.90 टक्क्यांनी वधारली आहे.
इंडियन हॉटेल्स :
कोविड लॉकडाऊननंतर भारतीय हॉटेल उद्योगात पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज फर्मने असा अंदाज व्यक्त केला आहे की, या चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत पर्यटन आणि हॉटेल क्षेत्रांने अप्रतिम प्रदर्शन केले आहे. आयसीआयसीआय डायरेक्टने जाहीर केलेल्या रिसर्च अहवालानुसार, इंडियन हॉटेल्स कंपनीचा स्टॉक 335 ते 341 रुपयांच्या दरम्यान खरेदी करण्यास योग्य किंमत आहे. पुढील काळात हा स्टॉक 388 रुपये किमती पर्यंत वाढू शकतो.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअरची किंमत 1.46 टक्क्यांनी पडली असून स्टॉक 335 रुपयांवर ट्रेड करत होता. मागील 5 वर्षात या कंपनीने शेअर बाजारातील आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 208.61 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी, मागील एका वर्षभरात इंडियन हॉटेल कंपनीच्या शेअरची किंमत 62.05 टक्क्यांनी वर गेली आहे. 2022 हे वर्ष शेअर धारकांसाठी थोडीफार गोंधळाचे राहिले आहे. या कालावधीत इंडियन हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 82.02 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.