28 April 2024 1:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
x

Stock Investment | हा शेअर 27 टक्के सवलतीत मिळत आहे, ब्रोकरेज फर्मनी का दिला गुंतवणुकीचा सल्ला, किती परतावा मिळेल?

Stock Investment

Stock Investment| मागील काही महिन्यांत शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे काही दिग्गज आणि मोठ्या कंपनीच्या शेअर्स मध्ये लक्षणीय घट दिसून आली आहे. या कंपनीचे मूलभूत तत्त्वे अतिशय मजबूत आहेत. सध्या शेअर बाजारातील घसरणीमुळे तेजीचा दृष्टीकोन असलेल्या काही स्टॉकचे मूल्यांकन आकर्षक बनले आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीत या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली तर भविष्यात तुम्ही अप्रतिम नफा कमवू शकता. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉक बद्दल माहिती घेणार आहोत, जो पुढील काळात अप्रतिम नफा कमावून देऊ शकतो. आपण ज्या स्टॉकबद्दल चर्चा करत आहोत त्याचे नाव आहे, ” ICICI Lombard”. अनेक दिग्गज ब्रोकरेज फर्मने विमा क्षेत्रातील या दिग्गज स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणतात की कंपनीची आर्थिक स्थिती जबरदस्त मजबूत आहे आणि पुढील काळात हा स्टॉक उच्चांकी वाढ स्पर्श करू शकतो, ही क्षमता स्टॉकमध्ये आहे.

ब्रोकरेज हाऊसचा मोतीलाल ओसवालचा अहवाल :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी ICICI लोम्बार्डचे शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकसाठी 1,450 रुपयांची लक्ष्य किंमत निर्धारित केली आहे, जी सध्याच्या ट्रेडिंग किमतीपेक्षा 26 टक्क्यांनी अधिक आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की आर्थिक वर्ष FY23/FY24 मध्ये ICICI Lombard कंपनीची कमाई वाढण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्मने या कालावधीत कंपनीची कमाई 11-14 टक्के वाढेल असा अंदाज वर्तवला आहे. गुंतवणुकीतून मिळणाऱ्या अधिक उत्पन्नामुळे या कंपनीची वाढ तेजीत होत आहे. आर्थिक वर्ष FY22-25 मध्ये या कंपनीची कमाई आणि PAT 18 टक्के आणि 26 टक्के CAGR ने वाढतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ब्रोकरेज हाऊस एमके ग्लोबलचा अहवाल :
ब्रोकरेज हाऊस MK ग्लोबलने हे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊस एमके ग्लोबलने या स्टॉक ची खरेदी करण्यासाठी 1,470 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. ब्रोकरेज हाऊसने माहिती दिली आहे की, या कंपनीची कामगिरी सकारात्मक राहिली असून कंपनीचा PAT 591 कोटींपर्यंत वाढला आहे. कंपनीच्या जास्त भांडवली नफ्यामुळे कमाईत सुधारणा दिसून आली आहे. ऑपरेटिंग पॅरामीटर्सवर या विमा कंपनीची कामगिरी वाढती दिसून येत आहे. व्यापार वाढीच्या दृष्टिकोनावर कंपनीच्या व्यवस्थापनाचे मत सकारात्मक आहे. भविष्यात कंपनी अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळवेल असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. ब्रोकरेज हाऊसने आर्थिक वर्ष FY24-25 साठी कमाईमध्ये जबरदस्त वाढ होईल असा अंदाज वर्तवला आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की हा स्टॉक सध्या खूप कमी किमतीवर ट्रेड करत असून यातील रिस्क रिवॉर्ड रेशो चांगले दिसत आहे.

ब्रोकरेज हाऊस येस सिक्युरिटीजचा अहवाल :
ब्रोकरेज हाऊस येस सिक्युरिटीजने ICICI लोम्बार्ड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकसाठी 1500 रुपयांची लक्ष्य किंमत निश्चित केली आहे, जी सध्याच्या ट्रेडिंग किमतीपेक्षा 31 टक्क्यांनी अधिक आहे. ब्रोकरेजचे म्हणणे आहे की कंपनीच्या TP लॉस रेशोमध्ये सुधारणा झाली आहे. आरोग्य, प्रवास आणि PA नुकसानीचे प्रमाण 810 bps ने वाढून 81.8 टक्के झाले आहे, परंतु कंपनीच्या व्यवस्थापक मंडळाला आणखी वाढ अपेक्षित आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stock Investment advice from expert to buy ICICI Lombard share for high returns 21 October 2022.

हॅशटॅग्स

#Stock Investment(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x