
PFC Share Price | पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर धारकांसाठी एक खुशखबर आली आहे. पीएफसी लिमिटेड ही सरकारी मालकीची कंपनी आपज्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. नुकताच या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1 : 4 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पीएफसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 263 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी पीएफसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.36 टक्के वाढीसह 265.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
बोनस शेअर्स डिटेल :
पीएफसी लिमिटेड ही कंपनी आपल्या विद्यामन पात्र गुंतवणूकदारांना रेकॉर्ड तारिखच्या अधीन राहून 4 शेअर्सवर एक बोनस शेअर मोफत देणार आहे. बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख कंपनीने अद्याप निश्चित केलेली नाही. या कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2023-24 साठी अंतिम लाभांश वाटप करण्याचा प्रस्ताव देखील मांडला आहे. याचा अर्थ संचालक मंडळाने शेअर धारकांची मंजुरी घेतल्यास सर्व पात्र गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स आणि लाभांश असा दुहेरी लाभ मिळणार आहे.
तिमाही कामगिरी :
2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत सरकारी मालकीच्या पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीने 31 टक्क्यांच्या वाढीसह 5,982.14 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी जून तिमाहीत या कंपनीने 4,579.53 कोटी रुपयये निव्वळ नफा कमावला होता. पीएफसी कंपनीने जून 2023 तिमाहीत 21,001.44 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. जो मागील वर्षीच्या जून तिमाहीत 18,544.04 कोटी रुपये होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.