
Piccadily Agro Share Price | पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. जगातील सर्वोत्तम सिंगल माल्ट व्हिस्कीचे उत्पादन करणारी हरियाणास्थित कंपनी पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स मागील काही काळापासून तेजीत धावत होते. आज मात्र हा स्टॉक लोअर सर्किटमध्ये अडकला आहे. ( पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनी अंश )
गुरूवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना तिप्पट नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 1,213.76 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज स्टॉक 4.08 टक्के घसरणीसह 871 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
1 ऑगस्ट 2023 रोजी पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज स्टॉक 69.32 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. त्यानंतर हा स्टॉक 910.70 रुपये या सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहचला होता. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1,213.76 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी एका वर्षापूर्वी पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 13 लाखांपेक्षा जास्त झाले आहे.
या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 66.50 रुपये होती. 2024 या वर्षात पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 234 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही जानेवारी 2024 मध्ये या स्टॉकवर 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.34 लाख रुपये झाले असते.
मागील एका महिन्यात पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 28 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. गेल्या 5 दिवसांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 18 टक्क्यांनी वाढली आहे. पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीला Indri Diwali 2023 Edition साठी जगातील सर्वोत्कृष्ट व्हिस्कीचा पुरस्कार मिळाला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.