
Piccadily Agro Share Price | पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज या स्मॉलकॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स मागील काही वर्षांत 80 पैशांवरून वाढून 735 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. या काळात कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 83000 टक्क्यांनी वाढवले आहे. ( पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनी अंश )
पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी 5 टक्के वाढीसह 667.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीने मार्च 2024 तिमाहीत निव्वळ नफ्यात 818 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. आज शुक्रवार दिनांक 3 मे 2014 रोजी पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 735.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना 83307 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 6593 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. 3 मे 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.97 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 30 एप्रिल 2024 रोजी हा स्टॉक 667.25 रुपये किमतीवर पोहचला होता. पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज स्टॉक मागील एका महिन्यात दुप्पट झाला आहे.
2 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 332.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 30 एप्रिल रोजी शेअर 667.25 रुपये किमतीवर पोहचले होते होते. मागील एका महिन्यात पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 101 टक्के नफा कमावून दिला आहे. 2024 यावर्षात पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज स्टॉक 145 टक्क्यांनी वाढला आहे. मागील 6 महिन्यांत पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. 2 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 222 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मार्च 2024 च्या तिमाहीत पिकाडिली ऍग्रो इंडस्ट्रीज कंपनीने 818.22 टक्के वाढीसह 43.34 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 4.72 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जानेवारी-मार्च 2024 या तिमाहीत कंपनीने 36.84 टक्के वाढीसह 266.53 कोटी रुपये निव्वळ विक्री नोंदवली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.