
PM Kisan Status | केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिली आहे. पीएम किसानच्या 15 व्या हप्त्याची तारीख निश्चित झाली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात 2000 चा हप्ता प्राप्त होण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. दोन दिवसांनी, 15 नोव्हेंबरला पीएम किसानचा 15 वा हप्ता जारी केला जाईल.
केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 15 वा हप्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी देशातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे हस्तांतरित केला जाईल.
या यादीतील आपले नाव कसे तपासावे ते येथे आहे
* पीएम-किसान वेबसाइटला भेट द्या pmkisan.gov.in
* होमपेजवर ‘फार्मर कॉर्नर’ निवडा.
* या स्टेपनंतर ‘बेनिफिशिअरी स्टेटस’वर क्लिक करा किंवा टॅप करा
* यानंतर ड्रॉप-डाऊन मेनूमधून तुम्ही राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक किंवा गाव निवडू शकता.
* यानंतर स्टेटस जाणून घेण्यासाठी ‘गेट रिपोर्ट’वर क्लिक करा.
काय आहे योजना
पीएम किसानच्या लाभार्थ्यांना वार्षिक 6,000 रुपयांचा रोख लाभ दिला जातो, जो प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिला जातो. ही योजना केंद्र सरकारची एक योजना आहे जी भारतभरातील शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत करते. या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये ही रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यात वर्ग केली जाते.
Disclaimer : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.