23 March 2023 5:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स तेजीत, नवी टार्गेट प्राईस पाहून गुंतवणूक केल्यास कडक फायदा होईल Realme Narzo 50 5G | रियलमी Narzo 50 5G स्मार्टफोनवर 26% डिस्काउंट, जबरदस्त ऑफर्सबद्दल जाणून घ्या Apar Industries Share Price | चमत्कारी शेअर! 10000 रुपयांवर 20 लाख रुपये परतावा, गुंतवणूकदार कशी कमाई करत आहेत पहा Indigo Paints Share Price | हा शेअर 50 परतावा देईल, मोतीलाल ओसवाल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, फायदा उचला Gratuity Calculator | तुम्ही 7 वर्षे नोकरी केली असेल तर तुम्हाला किती लाख ग्रॅच्युइटीची रक्कम मिळेल? गणित जाणून घ्या SBC Exports Share Price | या पेनी शेअरमध्ये वाढ होतेय, शेअरची किंमत 17 रुपये, गुंतवणुक करण्याआधी डिटेल्स वाचा Sula Vineyards Share Price | दारू नव्हे तर या दारू कंपनीच्या शेअरची खरेदी करा, स्टॉक मजबूत परतावा देईल, डिटेल्स पहा
x

Money From IPO | मस्तच! पैसाच पैसा, स्टॉक लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशी 110% परतावा, आता खरेदी करावा का हा स्टॉक?

Money From IPO

Money From IPO | PNGS Gargi या कॉस्च्युम आणि फॅशन ज्वेलरीच्या व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने अद्भूत कामगिरी केली आहे. IPO लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी या कंपनीचे शेअर्सने 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर ओपनिंग केली होती. बीएसई इंडेक्सवर या कंपनीचे शेअर्स 62.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 20 डिसेंबर 2022 रोजी ही कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आली होती. या कंपनीच्या शेअर्सने स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के प्रॉफिट कमावून दिला आहे. PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीच्या शेअर्सची IPO किंमत 30 रुपये प्रति शेअर होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | PNGS Gargi Fashion Jewellery Stock Price | BSE 543709)

दुसऱ्या दिवशी 110 टक्के नफा :
बीएसई एसएमई एक्सचेंजवर सूचिबद्ध झाल्यावर या कंपनीच्या शेअर्सनी 62.80 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत स्पर्श केली. सध्या हा स्टॉक आपल्या IPO किंमतीच्या तुलनेत 110 टक्के वाढीसह ट्रेड करत आहे. म्हणजेच ज्या लोकांनी या आयपीओमध्ये पैसे लावले होते, आणि आपली गुंतवणूक होल्ड केली, त्यांना लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशी जबरदस्त परतावा मिळाला आहे. त्यांची गुंतवणूक जवळपास दुपटीने वाढली आहे.

57 रुपयांमध्ये लिस्टिंग झाली :
20 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स बीएसई एसएमई एक्सचेंजवर 57 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. त्यानंतर ट्रेडिंग सेशन दरम्यान स्टॉक 59.85 रुपयांपर्यंत गेला होता. PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीने 7.8 कोटी रुपयांचा IPO बाजारात आणला होता. हा IPO 8 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता, तर आणि 13 डिसेंबर 2022 रोजी त्याची मुदत पूर्ण झाली होती. IPO मध्ये या शेअरची किंमत 30 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीच्या IPO लॉटमध्ये कमाल 4000 शेअर्स ऑफर करण्यात आले होते. किरकोळ गुंतवणूकदाराना किमान 1 लॉटमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक होते.

कंपनीची कामगिरी आणि व्यापार :
PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनी मुख्यतः आपल्या ग्राहकांना लग्न आणि सण समारंभ यांसारख्या विशेष प्रसंगासाठी कृत्रिम दागिन्यांची विस्तृत श्रेणी ऑफर करते. आर्थिक वर्ष 2022 मध्ये या कंपनीने 110.53 लाख रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी कंपनीने 0.35 लाख रुपये निव्वळ नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 2022 मध्ये या कंपनीने एकूण 593.94 लाख रुपये उत्पन्न कमावले होते. त्याच वेळी आर्थिक वर्ष 2021 मध्ये या कंपनीने 0.63 लाख रुपये एकूण उत्पन्न कमावले होते. चालू आर्थिक वर्षात 30 सप्टेंबर 2022 पर्यंत कंपनीने 213.17 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. त्याच वेळी कंपनीने 1189.18 लाख रुपये एकूण महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| PNGS Gargi Fashion Jewellery Share Price doubled Investors money check details on 22 December 2022.

हॅशटॅग्स

Money From IPO(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x