
Polycab Share Price | पॉलीकॅब इंडिया या वायर निर्मिती करणाऱ्या कंपनीवर आयकर विभागाने रेड मारली आहे. या छाप्यात मिळालेल्या गोष्टीबाबत कंपनी किंवा आयकर विभागाने कोणतीही माहिती दिली नाहीये. ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सने विश्वास व्यक्त केला आहे की, सध्या सुरू असलेल्या आयकर विभाग आणि पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या गोंधळा दरम्यान कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणुक करण्याची संधी लोकांना मिळणार आहे.
आज हा कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या परिसरावर आयकर विभागाने छापा टाकल्याची बातमी मागील आठवड्यात समोर आली होती, पण हे छापे डिसेंबर 2023 मध्ये टाकण्यात आले होते. बातमी उशिरा आली. आज शुक्रवार दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी पॉलीकॅब इंडिया स्टॉक 1.60 टक्के घसरणीसह 4,365.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
आयकर विभागाने पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या 50 ठिकाणावर छापे मारले होते. यात 1,000 कोटी रुपये मूल्याच्या बेहिशेबी रोख विक्रीची माहिती मिळाली आहे. आयकर विभागाने माहिती दिली की, प्रत्यक्षात पॉलीकॅब इंडिया कंपनीचे नाव घेतलेले नाही, मात्र आयकर विभागाने वायर आणि केबल्स बनवणाऱ्या मोठ्या कंपनीवर छापा टाकल्याची बातमी दिली आहे.
दुसरीकडे पॉलीकॅब कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत आयकर विभागाच्या छाप्याची माहिती दिली आहे. ही बातमी बाहेर येताच पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री सुरू झाली आहे. काही दिवसांतच शेअर्सची किंमत 30 टक्के पडली आहे.
पॉलीकॅब इंडिया कंपनीने म्हंटले आहे की, आयकर विभागाच्या चौकशीच्या निकालांबाबत कोणतीही माहिती मिळाकेली नाहीये. कंपनीने हे स्पष्टीकरण देताच शेअर दुसऱ्या दिवशी तेजीत आला. अवघ्या तीन ट्रेडिंग सेशनमध्ये पॉलीकॅब इंडिया स्टॉक 12 टक्के वाढला. 16 जानेवारी 2024 रोजी पॉलीकॅब इंडिया स्टॉक 3.36 टक्क्यांच्या वाढीसह 4339.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
जेफरीज फर्मने देखील पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या स्टॉकवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदीचा सल्ला दिला आहे. जेफरीजच्या मते, पॉलीकॅब इंडिया स्टॉक पुढील काळात 7,000 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. म्हणजेच शेअर सध्याच्या किंमत पातळीवरून 61 टक्के अधिक वाढू शकतो.
गोल्डमन सॅक्स फर्मने पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या शेअर्सवर बाय रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यावर तज्ञांनी 5,750 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. हा स्टॉक सध्याच्या किंमत पातळीवरून 32 टक्के अधिक वाढू शकतो.
जेफरीज फर्मच्या तज्ञांच्या मते, डिसेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केल्यावर या स्टॉकची विक्री वार्षिक आधारावर 15 टक्के जास्त वाढू शकते. जेफरीज फर्मने पॉलीकॅब इंडिया कंपनीवर पडलेल्या आयकर छाप्याची तुलना 2023 मधील अन्य कंपन्यांवर पडलेल्या आयकर छाप्यांशी केली आहे. यामध्ये Hero MotoCorp आणि Mankind Pharma सारख्या कंपन्यां सामील आहेत. आयकर विभागाच्या छाप्यांनंतर या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले होते. मागील सहा महिन्यांत हिरो मोटोकॉर्प कंपनीचे शेअर्स 40 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. तर मॅनकाइंड फार्मा स्टॉक सहा महिन्यांत 20 टक्क्यांनी वाढला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.