14 December 2024 4:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

BHEL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! भरवशाचा BHEL शेअर अल्पावधीत 50 टक्के परतावा देईल, टार्गेट प्राइस जाणून घ्या

BHEL Share Price

BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील अनेक तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा सरकारी स्टॉक पुढील काळात आणखी वाढू शकतो. ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी बीएचईएल कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस 150 रुपयेवरून वाढवून 300 रुपये केली आहे. म्हणजेच हा स्टॉक 50 टक्के अधिक वाढू शकतो.

ब्रोकरेज फर्मने दिलेल्या माहितीनुसार कोल पॉवर प्लांट बॅकअपमध्ये असून रिलायबल पॉवर त्यावर काम करत आहे. तज्ञांच्या मते, 2024 या वर्षात बीएचईएल कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 65000 कोटी रुपये होऊ शकतो. आज शुक्रवार दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 3.25 टक्के वाढीसह 219.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

तज्ञांच्या मते, पुढील काही वर्षात बीएचईएल कंपनीमध्ये सध्याच्या स्तरावरून एकूण मार्जिनमध्ये 300 बेसिस पॉइंट्सची सुधारणा पाहायला मिळू शकते. कंपनीच्या मोठ्या ऑर्डर बुक्सच्या अंमलबजावणीमध्ये 30-40 टक्के अधिक वाढ पाहायला मिळू शकते. त्यामुळे ICICI सिक्युरिटीज फर्म सारख्या दिग्गज संस्थांनी बीएचईएल स्टॉकची टारगेट प्राइस 300 रुपये निश्चित केली आहे.

ब्रोकरेज फर्म अँटिकच्या मते, बीएचईएल कंपनीचा सरकारी स्टॉक 230 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मागील 12 महिन्यांत बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे. बीएचईएल स्टॉकचा आढावा घेणाऱ्या 18 पैकी 5 तज्ञांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर 12 तज्ञांनी स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे.

जेफरीज फर्मच्या तज्ञांनी बीएचईएल कंपनीचे शेअर्स विकण्याचा सल्ला दिला आहे. तर CLSA फर्मने या स्टॉकची टारगेट प्राइस 78 रुपये निश्चित केली आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मच्या तज्ञांनी बीएचईएल स्टॉकवर 65 रुपये प्रति शेअर टारगेट प्राइस निश्चित केली आहे.

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने दिलेल्या माहितीनुसार बीएचईएल स्टॉकमध्ये वाढ पाहायला मिळू शकते. मात्र ही वाढ कोणत्याही तार्किक फ्रेमवर्कवर आधारित नसेल. फक्त शेअर बाजारातील तेजीच्या दृष्टीकोनातून हा स्टॉक तेजीत वाढू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BHEL Share Price NSE Live 19 January 2024.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x