
Polycab Share Price | पॉलीकॅब इंडिया या फास्ट मूव्हिंग इलेक्ट्रिकल गुड्स कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केल्याने स्टॉक तेजीत आला आहे. पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. पॉलीकॅब इंडिया कंपनीचे शेअर्स 17 जुलै 2020 रोजी 822.2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.83 टक्के वाढीसह 4,560.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Polycab India Share Price)
मागील तीन वर्षात पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या.गुंतवणुकदारांना 402 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी तीन वर्षांपूर्वी पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 5.02 लाख रुपये झाले.
पॉलीकॅब इंडिया लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी वायर आणि केबल उत्पादन कंपनी म्हणून ओळखली जाते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पॉलीकॅब इंडिया कंपनीचे बाजार भांडवल 61,862 कोटी रुपये होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पॉलीकॅब इंडिया कंपनीचे शेअर्स 5.52 टक्के वाढीसह 4127.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
तांत्रिकदृष्ट्या पॉलीकॅब इंडिया स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 73.8 अंकावर असून तो जास्त खरेदी झाला आहे, असे कळते. पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या शेअरचा एक वर्षाचा बीटा 0.7 असून तो कमी अस्थिरता दर्शवतेचे निर्देशक आहे. पॉलीकॅब इंडिया कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 200 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेज किमतीच्या वर ट्रेड करत आहे. मागील एका वर्षात स्टॉक या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 107.37 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 60.01 टक्के परतावा कमावून दिला आहे.
वायर आणि केबल निर्मात्या पॉलीकॅब इंडिया कंपनीने जून 2023 च्या तिमाहीत 81.68 टक्के वाढीसह 399.27 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 219.76 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. 2023-24 या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने विक्रीमध्ये 42.13 टक्के वाढ साध्य केली होती. तर कंपनीच्या एकूण सेल्सचे मूल्य 3889.38 कोटी रुपये नोंदवले गेले होते.
जून 2022 च्या तिमाहीत कंपनीने 2736.56 कोटी सेल्स नोंदवली होती. तज्ञांच्या मते गुंतवणूकदारांनी सध्याच्या किंमत पातळीवर प्रॉफिट बुक करणे उचित असेल. कारण हा स्टॉक 3910 रुपये सपोर्ट किमतीच्या खाली जाण्याची शक्यता आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 28.73 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.