
Polychem Share Price | ‘पॉलीकेम’ या स्मॉल कॅप केमिकल कंपनीच्या शेअरमध्ये बुधवारच्या ट्रेडिंग दरम्यान 2 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. दिवसा अखेर कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 1234.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शेअरमध्ये ही अचानक आलेली तेजी बाजारात विक्रीचा दबाव असताना पाहायला मिळाली होती. (Polychem Share Price BSE)
पॉलीकेम कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी येण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आपल्या शेअर धारकांना प्रति शेअर 200 टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. सेबीला दिलेल्या माहिती कंपनीने म्हंटले आहे की, आर्थिक वर्ष 2022-23 च्या Q4 साठी संचालक मंडळाने प्रति शेअर 20 रुपये म्हणजेच 200 टक्के लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आज गुरूवार दिनांक 18 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 1,296.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
तिमाही निकाल तपशील :
मार्च 2023 तिमाहीत पॉलीकेम कंपनीच्या निव्वळ उत्पन्नात वार्षिक 15.04 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या तिमाहीत कंपनीने 12.85 कोटी रुपये कमाई केली आहे. यामध्ये कंपनीचा निव्वळ नफा 1.49 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 0.55 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता, त्या तुलनेत मार्च 2023 तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 170.90 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.
स्टॉकची कामगिरी आणि परतावा :
मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 127.03 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने लोकांना 45.92 टक्के परतावा कमावून दिला आहे. जानेवारी ते मार्च 2023 या तिमाहीमधील लेटेस्ट शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, LIC कंपनीने पॉलीकेम कंपनीचे 11,257 शेअर्स म्हणजेच 2.79 तक्के भाग भांडवल धारण केले आहे. पॉलीकेम कंपनी मुख्यतः स्टायरीन, पॉलिस्टीरिन, विनाइल एसीटेट, पॉलीविनाइल अल्कोहोल, यांचे उत्पादन करण्याचे काम करते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.