 
						Poonawala Fincorp Share Price Today | अदार पूनावाला यांच्या मालकीच्या ‘पूनावाला फिनकॉर्प’ कंपनीने मार्च 2023 तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे. ‘पूनावाला फिनकॉर्प’ कंपनीने मार्च 2023 तिमाहीत 181 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ‘पूनावाला फिनकॉर्प’ कंपनीचा नफ्यात एका वर्षात 103 टक्के नोंदवली गेली आहे.
Poonawala Fincorp Limited Stock Price Today on NSE & BSE
मागील वर्षी मार्च 2022 तिमाहीत या कंपनीने 89 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. गुरूवार दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.98 टक्के वाढीसह 320.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मार्च 2023 तिमाहीत ‘पूनावाला फिनकॉर्प’ कंपनीच्या व्याज उत्पन्नात 53 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीने 552 कोटी रुपये व्याज उत्पन्न कमावला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीने 361 कोटी रुपये कमाई केली होती. कंपनीचे निव्वळ व्याज मार्जिन 10.7 टक्के वरून वाढून मार्च 2023 च्या तिमाहीत 11.3 टक्केवर पोहचले आहे.
पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 2 रुपये लाभांश देण्याची घोषणा केली आहे. जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत कंपनीचा एकूण सेल्स/कर्ज वितरण 6371 कोटी रुपये आहे.
22 मे 2020 रोजी पूनावाला फिनकॉर्प कंपनीचे शेअर्स 13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र सध्या हा स्टॉक 320 रुपयांवर पोहचला आहे. 26 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 308.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 2200 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 22 मे 2020 रोजी पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 23 लाख रुपये झाले असते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		