
Poonawalla Fincorp Share Price | पूनावाला फिनकॉर्प या नॉन बँकिंग फायनान्स कंपनीच्या शेअरमध्ये खरेदी वाढली आहे. मागील तीन वर्षात पूनावाला फिनकॉर्प कंपनीचे शेअर 13 रुपयेवरून वाढून 375 रुपयेवर पोहोचले आहेत. या कालावधीत पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शरसस आपल्या गुंतवणुकदारांना 2660 टक्के नफा कमावून दिला आहे. (Poonawalla Share Price)
पूनावाला फिनकॉर्प कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4 टक्के वाढीसह 375.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 6 जुलै 2023 रोजी पूनावाला फिनकॉर्प कंपनीचे शेअर्स 0.62 टक्के वाढीसह 370.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जून 2023 तिमाहीच्या बिझनेस अपडेटमुळे पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. पूनावाला फिनकॉर्प कंपनीने आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत 7050 कोटी रुपये हे आतापर्यंतचे सर्वाधिक कर्ज वितरण साध्य केले आहेत. मागील वर्षीच्या याच तिमाही काळात कंपनीच्या वितरणामध्ये 143 टक्के वाढ पाहायला मिळाली होती.
मागील वर्षी जून 2022 तिमाहीत पूनावाला फिनकॉर्प कंपनीने 2901 कोटी रुपये कर्ज वितरित केले होते. मार्च 2023 तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या एकूण कर्ज वितरणामध्ये 11 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. पूनावाला फिनकॉर्प कंपनीने जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीमध्ये 6371 कोटी रुपये कर्ज वितरण केले होते.
पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या डायरेक्ट डिजिटल प्रोग्राममध्ये मजबूत वाढ नोंदवली गेली आहे. आर्थिक वर्ष 23-2024 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीच्या एकूण वितरणामध्ये डायरेक्ट डिजिटल प्रोग्रामचा वाटा 86 टक्के होता. एकेकाळी पूनावाला फिनकॉर्प कंपनीचे शेअर्स 13.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 5 जुलै 2023 रोजी पूनावाला फिनकॉर्प कंपनीचे शेअर्स 375.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षांत 2660 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 29 मे 2020 रोजी पूनावाला फिनकॉर्प कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 28.14 लाख रुपये झाले असते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.