3 May 2025 1:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Post Office RD Vs Bank RD | तुमचा फायदा कुठे? पोस्ट ऑफिस RD की बँक RD? अधिक पैसे कोणती गुंतवणूक देईल जाणून घ्या

Post Office RD vs Bank RD

Post Office RD vs Bank RD | भारतातील बहुतेक लोक अल्पबचत योजनेत गुंतवणूक करून पैसे कमवतात. अल्पबचत खात्यात गुंतवणूक करणारे लोक सहसा खुल्या बाजारातील जोखीम पासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत, जेव्हा आपण सुरक्षित आणि निश्चित परतावा कमावून देणाऱ्या योजनाबद्दल विचार करतो, तेव्हा आपल्या मनात सर्वात प्रथम आवर्ती ठेव म्हणजे RD स्कीमचा विचार येतो. रिकरिंग डिपॉझिट्सद्वारे तुम्ही दर महिन्याला छोटी रक्कम गुंतवणूक किंवा बचत करू शकता. गुंतवणूकदारांसाठी ही योजना कमी जोखमीत हमखास परतावा कमावून देते.

जवळपास सर्व सरकारी, खाजगी बँकांव्यतिरिक्त, पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूकदारांना आरडी स्किममधे गुंतवणूक करण्याचा पर्याय मिळतो. एवढेच नाही तर स्मॉल फायनान्स बँकही आपल्या ग्राहकांना ही योजना ऑफर करतात. सामान्य RD योजनेच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना RD खात्यावर जास्त व्याज परतावा मिळतो. या योजनेमध्ये व्याजाची गणना चक्रवाढ पद्धतीने दर तिमाही आधारावर केली जाते. RD योजनेत मिळणारे व्याज चक्रवाढ पद्धतीने दर तीन महिन्यांनी दिले जाते. म्हणजेच या योजनेत तुमच्या ठेवीचा कालावधी जेव्हढा जास्त असेल, तेव्हढा जास्त फायदा तुम्हाला मिळेल. म्हणूनच आरडी योजनेत गुंतवणूक करताना तुम्ही दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून पैसे लावले पाहिजे.

टॉप बँक आणि पोस्ट ऑफर RD स्कीमचे व्याजदर :
* SBI RD : 6.1 टक्के (1 वर्ष आणि 5-10 वर्ष ठेवींवर)
* ICICI Bank RD : 4.50 takke-6.50 टक्के (6 महिने ते 120 महिन्यांच्या ठेवीवर)
* HDFC बँक RD : 4.50 टक्के -6.25 टक्के (6 महिने आणि 120 महिने ठेवीवर)
* पोस्ट ऑफिस RD : 5.80 टक्के वार्षिक
अनेक बँका खाजगी आणि सरकारी बँका ज्येष्ठ नागरिकांना 0.75 टक्क्यांनी जास्त व्याज परतावा देतात.

10 वर्षात 20 लाख परतावा कसा मिळेल? :
ही गणना समजून घेण्यासाठी आपण टॉप शीर्ष बँकांचे RD व्याजदर विचारात घेऊ. त्यापैकी ICICI बँक सध्या 10 वर्षांच्या RD ठेवीवर वार्षिक 6.50 टक्के म्हणजे सर्वाधिक व्याज परतावा देते. RD कॅल्क्युलेटरच्या मदतीने गणना केल्यास, 20 लाख रुपये परतावा मिळवण्यासाठी तुम्हाला 10 वर्ष दरमहा 12,000 रुपये जमा करावे लागेल. यात तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक 14.40 लाख रुपये असेल, आणि त्यावर तुम्हाला 5,87,855 रुपये व्याज परतावा मिळेल. अशा पद्धतीने तुम्हाला 20,27,855 रुपये परतावा कोणतीही जोखीम न घेता सहज कमावता येईल.

पोस्ट ऑफिस RD मध्ये मिळणारा व्याज परतावा :
पोस्ट ऑफीस आरडी योजनेत 10 वर्ष गुंतवणूक करून 20 लाख रुपये परतावा मिळवण्यासाठी तुम्हाला 12,300 रुपये दरमहा गुंतवणूक करावे लागतील. पोस्ट ऑफिस आरडी योजनेचा परिपक्वता कालावधी 5 वर्ष असतो. हा कालावधी तुम्ही आणखी 5 वर्ष वाढवू शकता. त्याच वेळी SBI मध्ये 10 वर्ष RD गुंतवणूक केल्यास तुम्हाला 6.10 टक्के दराने व्याज परतावा मिळेल. SBI मध्ये RD गुंतवणूक करून 20 लक्ष रुपये परतावा मिळवण्यासाठी तुम्हाला दरमहा 12,100 रुपये जमा करावे लागतील. त्याचप्रमाणे, HDFC बँकेत 10 वर्षांच्या RD वर तुम्हा 6.25 टक्के दराने व्याज परतावा मिळू शकतो. HDFC च्या RD मध्ये गुंतवणूक करून 20 लाख रुपये परतावा हवा असेल तर तुम्हाला दरमहा 12,000 रुपये आरडी खात्यात जमा करावे लागतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Post Office RD vs Bank RD for long term investment benefits check details on 22 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Post Office RD vs Bank RD(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या