 
						PPF Scheme | PPF या सरकारी योजनेत लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व भारतीय नागरिक पैसे जमा करू शकतात. PPF योजनेचा लॉक-इन कालावधी 15 वर्ष आहे, सोबत या योजनेत गुंतवणूक केल्यास चक्रवाढ पद्धतीने परतावा मिळतो. या योजनेत इतर गुंतवणुकीपेक्षा अधिक व्याज परतावा मिळतो. सध्या या योजनेत गुंतवणूक केल्यास सरासरी वार्षिक 7.1 टक्के व्याज मिळतो. या योजनेत मिळणारा व्याज दर बँकेच्या मुदत ठेव योजनेपेक्षा खूप अधिक आहे. या योजनेत दरमहा 1,000 रुपये जमा केल्यास 15 वर्ष कालावधीत तुम्हाला 3.21 लाख रुपये मिळू शकतात.
दरमहा 3000 गुंतवणुकीवर मिळणारा परतावा :
तुम्ही PPF योजेनेत 500 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही दरमहा 500 रुपये जमा करायला सुरुवात केली तर, 15 वर्षांनंतर तुमच्याकडे 1.6 लाख रुपये इतका फंड तयार होईल. जर तुम्ही दरमहा 2,000 रुपये जमा केल्यास 15 वर्षांत तुमच्याकडे 6.43 लाख रुपये चा जबरदस्त फंड तयार होईल. समजा तुमचे ध्येय खूप मोठे आहे, आणि तुम्ही 3000 रुपये इतकी रक्कम गुंतवू इच्छित असाल तर 15 वर्षात तुम्हाला 9.64 लाख रुपये परतावा मिळेल. PPF योजनेत तुम्ही एका आर्थिक वर्षात कमाल 1.5 लाख रुपये जमा करू शकता.
PPF खाते कुठे उघडावे? :
PPF योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही नजीकच्या पोस्ट ऑफिस शाखेत किंवा बँकेत जाऊन अर्जाद्वारे पीपीएफ खाते उघडून गुंतवणूक करू शकता. PPF योजनेचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या अल्पवयीन मुलांच्या नावाने खाते उघडू शकता. परंतु तो 18 वर्षांचा होईपर्यंत काळजीवाहक म्हणून तुम्हाला खाते ऑपरेट करावे लागले. PPF खात्यात हिंदू अविभक्त कुटुंबाच्या नावाने पीपीएफ खाते उघडता येत नाही.
5 वर्षांची मुदतवाढ :
PPF खात्याचा परिपक्वता कालावधी 15 वर्षे निश्चित करण्यात आला आहे. परंतु, यानंतरही तुम्ही तुमची गुंतवणूक सुरू ठेवू शकता. म्हणजे तुम्ही तुमच्या PPF योजनेचा कालावधी दर 5-5 वर्षानी वाढवू शकता. योजनेचा मॅच्युरिटी कालावधी पूर्ण होण्याच्या 1 वर्ष आधी, तुम्हाला मुदत वाढीचा अर्ज करावा लागेल. अशाप्रकारे तुम्ही दर 5 वर्षानंतर तुम्ही योजनेचा कालावधी वाढवू शकता. त्यावर तुम्हाला चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळत राहील आणि तुमची गुंतवणूकही वाढत राहील.
प्री-विड्रॉवलचा लॉक इन कालावधी :
PPF योजनेत प्री-विड्रॉवलसाठी लॉक-इन कालावधी 5 वर्ष निश्चित करण्यात आला आहे. म्हणजे समजा तुम्ही PPF योजनेत खाते उघडले, आणि तुम्हाला योजना परिपक्व होण्याआधी पैसे काढायचे असतील तर, तुम्हाला खाते उघडल्यावर किमान 5 वर्षांपर्यंत पैसे काढता येणार नाहीत. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, फॉर्म 2 भरून तुम्ही तुमच्या खात्यातील पैसे प्री-विड्रॉवल करु शकता. तथापि, हा 5 वर्ष कालावधी संपल्यावर तुम्हाला 15 वर्षापूर्वी पैसे काढता येणार नाही.
PPF वर EEE कर सवलत :
PPF योजना आयकराच्या EEE श्रेणीत येते. याचा अर्थ PPF योजनेत केलेल्या संपूर्ण गुंतवणुकीवर आयकर कायद्यातील कलम 80C नुसार कर सवलत मिळते. याशिवाय त्या गुंतवणुकीवर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी संपूर्ण रक्कमही आयकर अंतर्गत करमुक्त मानली जाते. त्यामुळे, दीर्घकालीन लाभ मिळविण्यासाठी PPF योजना एक उत्तम गुंतवणूक पर्याय मानला जातो.
पीपीएफ जप्ती पासून अबाधित :
तुमचे PPF खाते कोणत्याही न्यायालय किंवा आदेशानुसार कर्ज किंवा इतर दायित्वाच्या वसुलीसाठी किंवा थकबाकी वसुलीसाठी जप्त केले जाऊ शकत नाही. या प्रकरणातही ही योजना चांगली आणि उपयुक्त आहे. भारत सरकार कडून या योजनेला सुरक्षा हमी प्रदान करण्यात आली आहे. ही योजना सर्वप्रकारच्या कर्ज दायित्व पासून मुक्त आहे.
पीपीएफ खात्यावर स्वस्त कर्ज मिळते :
पीपीएफ योजना खात्यावर तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता. मात्र, यासाठी एक अट आहे. खाते उघडलेले आर्थिक वर्ष वगळता पुढील वर्षापासून ते पाच वर्षांच्या कालावधीत तुम्ही PPF मधून कर्ज घेण्यास पात्र असाल. समजा तुम्ही जानेवारी 2017 मध्ये PPF खाते उघडून गुंतवणूक सुरू केली असेल तर तुम्ही 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2022 या कालावधीत PPF खात्यावर कर्ज घेऊ शकता. PPF खात्यातील ठेवीवर कमाल 25 टक्के रक्कम कर्ज स्वरूपात मिळू शकते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		