2 October 2022 2:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CBSE Board Exam 2023 | सीबीएसई दहावी-बारावी परीक्षेची डेटशीट डिसेंबरमध्ये प्रसिद्ध होणार, संपूर्ण अभ्यासक्रमातून प्रश्न विचारले जाणार Straight Hair Formulas | पार्लरमध्ये न जाता घरबसल्या कमी खर्चात करा हेअर स्ट्रेटनिंग, फॉलो करा या टिप्स Budhaditya Yoga | ऑक्टोबरमध्ये बनवलेला हा खास योग, या 4 राशींच्या लोकांसाठी प्रगतीच्या संधी आणि शुभं आर्थिक काळ SBI Mutual Fund | एसबीआय म्युच्युअल फंडाची ही योजना कोटीत परतावा देत आहे, 9 पटीने पैसा वाढतोय, योजनेचं नाव सेव्ह करा 5G Internet Network | भारतात 5G लाँच, आता 4G सिम कार्ड फेकून नवा 5G स्मार्टफोन विकत घ्यावाच लागणार?, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं Credit Card | तुमच्या क्रेडिट कार्डवर आकारले जाणारे हे 5 शुल्क तुम्हाला माहित आहेत का?, हे गुप्त चार्जेस नेहमी लक्षात ठेवा, नुकसान टाळा Horoscope Today | 02 ऑक्टोबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

PPF Vs ELSS | या दोन जबरदस्त योजनांपैकी परतावा आणि टॅक्स सूट मिळवण्यासाठी कोणती योजना सर्वोत्तम, अधिक जाणून घ्या

PPF vs ELSS

PPF Vs ELSS | ही एक अशी गुंतवणूक योजना आहे ज्यामध्ये केलेली गुंतवणूक सुरक्षित असते आणि त्यातून गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळतो. तसेच टॅक्स बेनिफिट मिळत असेल तर काय म्हणावं! पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF आणि ELSS या दोन्ही योजना बद्दल गुंतवणूकदारांमध्ये आकर्षण वाढत आहे. दोन्ही योजना गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देतात आणि आयकर कायदा कलम 80C अंतर्गत कर सवलत देखील मिळते.

यामुळेच गुंतवणुकीसाठी या दोघांपैकी एकाची निवड करताना सामान्य माणूस खूप गोंधळून जातो. असे घडते कारण पहिल्या दृष्टीत या दोन्ही योजना चांगला परतावा देत असल्याचे दिसते. परंतु, या दोन्ही योजनांची स्वतःची वैशिष्ट्ये आणि काही तोटे देखील आहेत. त्यामुळे यादोन्ही योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांची तुलना करावी.

जोखीम:
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही सरकारद्वारे संचालित योजना आहे. त्यामुळे त्यात केलेली गुंतवणूक 100 टक्के सुरक्षित असते. आणि कोणतीही फसवणूक होण्याचा किंवा पैसे गमावण्याचा कोणताही धोका नसतो. त्यामुळे PPF ज्यांना कोणतीही जोखीम घ्यायची नाही अश्या गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम गुंतवणूक पर्याय मानला जातो. तर ELSS ही इक्विटी लिंक्ड गुंतवणूक योजना आहे. या योजनेतील गुंतवणुक बाजारातील जोखीमेच्या अधीन असते. म्हणून, जोखमीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास, पीपीएफ अधिक सुरक्षित आणि हमखास परतावा मिळवून देणारी योजना आहे.

परतावा:
PPF योजनेत मिळणाऱ्या परताव्याचा व्याज दर सरकारद्वारे निश्चित केला जातो. परतावा व्याजदर दर तिमाहीत निश्चित केला जातो. सध्या PPF वर वार्षिक 7.1 टक्के दराने चक्रवाढ व्याज परतावा दिला जातो. अशा प्रकारे, PPF वर निश्चित आणि हमखास परतावा मिळतो.

दुसरीकडे, ELSS गुंतवणूकदारांकडून उभारलेला बहुतांश पैसा इक्विटी आणि इक्विटी-संबंधित सिक्युरिटीजमध्ये गुंतवला जातो. त्यामुळे ELSS ची कामगिरी बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. शेअर बाजारात होणाऱ्या उलाढालीचा परिणाम ELLS योजनेच्या कामगिरीवर देखील होतो. त्यामुळे या योजनेत मिळणारा परतावा निश्चित नाही. ELSS योजनेत सहसा 12-14 टक्के परतावा मिळतो. परताव्याच्या बाबतीत ELSS योजना उत्तम आहे, पण त्यात जोखीम जास्त आहे.

गुंतवणुकीची मर्यादा:
PPF मध्ये एकरकमी किंवा जास्तीत जास्त 12 हप्त्यांमध्ये आर्थिक वर्षात तुम्ही 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. किमान 500 रुपये जमा केले जाऊ शकतात. PPF मध्ये किमान गुंतवणूक मर्यादा 500 रुपये आणि कमाल गुंतवणूक मर्यादा 1.5 लाख रुपये एवढी आहे. ELSS मध्ये कितीही रक्कम गुंतवली जाऊ शकते. यात गुंतवणूक करण्याची कोणतीही कमाल मर्यादा नाही.

कर लाभ:
पीपीएफमधील गुंतवणुकीवर तीन प्रकारचे कर लाभ उपलब्ध आहेत. त्यात गुंतवलेल्या पैशावर कर सवलतीचा लाभ मिळतो. परतावा व्याज आणि मुदतपूर्तीच्या रकमेवर कोणताही कर आकारला जात नाही. ELSS मधील गुंतवणुकीवर मिळालेला परतावा जर 1 लाख रुपयेपेक्षा जास्त असल्यास 10 टक्के दराने लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. PPF आणि ELSS मध्ये, एका वर्षात 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर लाभ मिळू शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PPF vs ELSS investment comparison and it’s long term benifits on 8 August 2022

हॅशटॅग्स

PPF vs ELSS(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x