
Prime Industries Share Price | प्राइम इंडस्ट्रीज या खाद्यतेल निर्माता कंपनीने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. मागील 5 वर्षात या कंपनीचे गुंतवणूकदार करोडपती झाले आहेत. या काळात शेअरची किंमत तब्बल 20,000 टक्के वाढली आहे. प्राईम इंडस्ट्रीज ही ही कंपनी व्हेजिटेबल ऑइल बनवणारी कंपनी आहे. या कंपनीचे उत्पादन युनिट पंजाबमधील फिरोजपूर येथे ठिकाणी स्थित आहे.
प्राइम इंडस्ट्रीज या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 209.76 कोटी रुपये आहे. मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी प्राइम इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.04 टक्क्यांच्या किरकोळ घसरणीसह 134.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी प्राइम इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 133.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी म्हणजेच 16 ऑगस्ट 2018 रोजी प्राइम इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर फक्त 0.60 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 22,233.33 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी प्राइम इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.23 कोटी रुपये झाले असते. अर्थातच तुम्ही आज करोडपती झाला असता.
जर तुम्ही प्राइम इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकमध्ये पाच वर्षापूर्वी फक्त 50,000 रुपये जरी लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 22,233.33 टक्क्यांनी वाढून तब्बल 1.12 कोटी रुपये झाले असते. प्राइम इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची अल्पकालीन कामगिरी देखील जबरदस्त राहिली आहे.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2,537.80 टक्के नफा कमावून दिला आहे. 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत प्राइम इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने लोकांना 2,096.72 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एक महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत फक्त 2.53 टक्के वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.