15 December 2024 5:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

MSME Atmanirbhar Fund | राष्ट्रीय लघूउद्योग महामंडळ उभारणार १० हजार कोटीचा आत्मनिर्भर निधी

MSME Atmanirbhar Fund

नवी दिल्ली, १३ ऑक्टोबर | राष्ट्रीय लघूउद्योग महामंडळ 10 हजार कोटी रुपयांचा आत्मनिर्भर निधी उभारणार आहे. यासाठी केंद्रीय एमएसएमई अर्थात सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (MSME Atmanirbhar Fund) यांनी पुढाकार घेतला आहे.

MSME Atmanirbhar Fund. The National Small Industries Corporation will set up a self-sufficient fund of Rs 10,000 crore. Union Minister for Micro, Small and Medium Enterprises Narayan Rane has taken the initiative for this :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांना विकास निधी मिळविण्यात येत असलेल्या अडचणीवर उपाययोजनेसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी आत्मनिर्भर पॅकेज दिले आहे. या अंतर्गत या उद्योगांना दिल्या जाणाऱ्या निधींसाठी एका रकमेची घोषणा केली. त्यासाठी भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या एनएसआयसी अर्थात राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ या मिनी-रत्न महामंडळाची 100% उपकंपनी असणाऱ्या एनव्हीसीएफएल या कंपनीची स्थापना करण्यात आली. एमएसएमई उद्योगांना विकास भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी निधी उभारण्यास मदत करण्याच्या उद्देशाने आणि 10,006 कोटी रुपयांचा लक्ष्यित निधीसह एनव्हीसीएफएलने आत्मनिर्भर निधीची स्थापना केली आहे.

यावेळी राणे यांनी अधिकाऱ्यांना ठामपणे बजावले की या क्षेत्राची मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली हवी आहे. त्यासाठी मंत्रालयाच्या सर्व विभागांना समन्वयाने काम करावे लागेल. समाजाचे भले करण्यासाठी मंत्रालयाने अधिक खर्च करायला हवा असे ते म्हणाले. एमएसएमई क्षेत्राच्या माध्यमातून भारताच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते आणि त्यातून अधिक स्थूल राष्ट्रीय उत्पन्न गाठणे शक्य होईल याकडे राणे यांनी लक्ष वेधले.

एनएसआयसी, एनव्हीसीएफएल आणि एसएलव्ही यांच्या अधिकाऱ्यांच्या योगदान करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. केंद्रीय एमएसएमई राज्यमंत्री भानूप्रताप सिंग वर्मा, एमएसएमई मंत्रालयाचे सचिव बी बी स्वेन, एनएसआयसीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि एनव्हीसीएफएलच्या अध्यक्ष अलका अरोरा आणि एसव्हीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष के.सुरेश या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यासाठी एसबीआयसीएपी व्हेंचर्स मर्या (एसव्हीएल) या कंपनीची गुंतवणूक व्यवस्थापन कंपनी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. एनव्हीसीएफएलची कायदेविषयक सल्लगार म्हणून खेतान आणि कंपनी काम पाहणार आहे. एनव्हीसीएफएलने सेबी अर्थात ठेवी आणि विनिमय मंडळाकडे खासगी प्लेसमेंट मेमोरँडम सादर केले असून त्यायोगे 1 सप्टेंबर 2021 ला सेबीने एसआरआय निधीची दुसऱ्या श्रेणीच्या पर्यायी गुंतवणूक निधी म्हणून नोंदणी केली.

आत्मनिर्भर निधी एमएसएमई क्षेत्रापुढील इक्विटी निधीच्या आव्हानाचा सामना करण्यास मदत करेल. या उद्योगांना त्यांच्या पुढील अडचणी पार करण्यासाठी आवश्यक क्षमता निर्माण करत कॉर्पोरेटायझेशनला प्रोत्साहन देईल. कमी प्रमाणात निधी मिळालेल्या सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांकडे विविध प्रकारच्या निधींचे सुरळीत मार्गीकरण करण्यात येईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: MSME Atmanirbhar Fund of rupees 10 thousand crore by MSME ministry.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x