
Pritika Auto Share Price | प्रितिका ऑटो इंडस्ट्रीज या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली होती. परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या तिमाहीत परकीय गुंतवणूकदारांनी प्रितिका ऑटो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक वाढवली आहे. या तिमाहीत परकीय संस्थागत गुंतवणूकदारांचा प्रितिका ऑटो इंडस्ट्रीज कंपनीमधील वाटा 1.34 टक्केवरून वाढून 2.41 टक्क्यांवर पोहचला आहे. गुरूवार दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी प्रितिका ऑटो इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के वाढीसह 41.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
परकीय गुंतवणूकदारांनी प्रितिका ऑटो इंडस्ट्रीज कंपनीचे 3689,881 शेअर्स धारण केले आहेत. प्रतिका ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या डिसेंबर 2023 मधील लेटेस्ट शेअरहोल्डिंग डेटानुसार FII ने प्रितिका ऑटो इंडस्ट्रीज कंपनीचे 36,89,881 शेअर्स होल्ड केले आहे. हे शेअर्स कंपनीच्या एकूण पेड अप कॅपिटलच्या 2.41 टक्के आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत प्रितिका ऑटो इंडस्ट्रीज कंपनीचे 11,90,042 शेअर्स परकीय गुंतवणूकदारांनी होल्ड केले होते. हे कंपनीच्या एकूण पेडअप कॅपिटलच्या 1.34 टक्के होते.
मागील एका आठवड्यात प्रितिका ऑटो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 25 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला होता. मागील दोन ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत. मागील एका महिन्यात प्रितिका ऑटो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 26 टक्के परतावा कमावून दिला होता. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 16.55 रुपयेवरून वाढून 43.45 रुपये किमतीवर पोहचली होती. याकाळात गुंतवणूकदारांनी तब्बल 150 टक्के नफा कमावला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.