27 November 2022 6:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अजून किती तक्रारी करायच्या? पुण्यात मनसे कार्यकर्त्यांच्या तात्यांनी पक्ष सोडावा यासाठीच वरिष्ठांकडून लाबिंग? लाव्हा फुटणार? OnePlus 11 5G Smartphone | लाँचिंगपूर्वी वनप्लस 11 स्मार्टफोनची माहिती लीक, फीचर्स आणि किंमत पहा Google Messages | गुगल शॉर्ट्सने इन्स्ट्राग्रामचा बँड वाजवल्यानंतर व्हॉट्सॲपचा बँड वाजवणार गुगल मेसेजेस? Bhediya Day Box Office | भेडिया सिनेमाची धमाकेदार कमाई, प्रेक्षकांच्या प्रतिसादाने कलेक्शन जोमात Business Idea | 1 लाख मासिक उत्पन्नासाठी सुरू करा हा व्यवसाय, सरकारकडून 35 टक्के अनुदान देईल, प्रोजेक्ट डिटेल्स Airtel Jio 5G | देशातील कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे 5G सेवा, पाहा संपूर्ण यादी, तुमचं शहर आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर शिंदेचं दुर्लक्ष, पण कंटेनर भरून खोके दिले अशा वायफळ प्रतिक्रियांसाठी प्रचंड वेळ?
x

Private Employee Salary Hike | खाजगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होऊ शकते?, रिपोर्ट प्रसिद्ध झाला

Private Employee Salary Hike

Private Employee Salary Hike | तुम्ही खासगी क्षेत्रातील कंपनीत काम करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी गुड न्यूजपेक्षा कमी असणार नाही. आगामी काळात कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात दहा टक्क्यांहून अधिक वाढ करणार आहेत. हा दावा एऑन पीएलसी या बहुराष्ट्रीय वित्तीय सेवा एजन्सीने केला आहे. त्यामुळे जर तुम्ही पगारामुळे नोकरी बदलण्याचा किंवा सोडण्याचा निर्णय घेतला असेल तर पुन्हा एकदा आपल्या निर्णयाचा विचार करा.

‘एऑन पीएलसी’ सर्वेक्षण रिपोर्ट :
भारतातील अनेक कंपन्या व्यवसायात दमदार कामगिरीसह आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात दहा टक्क्यांहून अधिक वाढ करण्याच्या तयारीत आहेत, असा दावा ‘एऑन पीएलसी’ने आपल्या ताज्या सर्वेक्षण अहवालात केला आहे. ब्रिटिश-अमेरिकन बहुराष्ट्रीय वित्तीय सेवा एऑन पीएलसीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, विविध क्षेत्रातील अनेक कंपन्या त्यांच्या व्यवसायात मजबूत कामगिरीची अपेक्षा करत आहेत. तसेच या कंपन्या आर्थिक वर्ष 2023 मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 10.4% वाढ करू शकतात. ताज्या सर्वेक्षण अहवालाचा हा आकडा फेब्रुवारीच्या पगारात ९.९ टक्के वाढीच्या अंदाजापेक्षा अधिक आहे. तर सन 2022 मध्ये पगारात 10.6 टक्के वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले होते.

कंपन्यांवर पगारवाढीसाठी मोठा दबाव :
एऑन पीएलसीने आपल्या सर्वेक्षणात देशातील सर्व क्षेत्रातील १,३०० कंपन्यांचा समावेश केला आहे. एजन्सीने म्हटले आहे की, 2022 च्या पहिल्या सहामाहीत, अॅट्रिशन रेट 20.3 टक्क्यांच्या सर्वोच्च पातळीवर होता. ज्यामुळे कंपन्यांवर पगारवाढीसाठी मोठा दबाव आहे. मात्र, नोकरी सोडणाऱ्यांची ही संख्या वर्ष २०२१ च्या तुलनेत २१ टक्क्यांनी कमी आहे. या अहवालानुसार पुढील काही महिने हा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता आहे.

जागतिक मंदी आणि महागाईची भीती :
जागतिक मंदी आणि भारतीय बाजारपेठेतील अस्थिर महागाईची भीती असली तरी आर्थिक वर्ष २०२३ मध्ये देशाची अंदाजित पगारवाढ दोन आकडी होण्याची शक्यता आहे, असे भारतातील ‘अऑन’चे भागीदार रूपांक चौधरी यांनी सांगितले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Private Employee Salary Hike survey check report 26 September 2022.

हॅशटॅग्स

#Private Employee Salary Hike(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x