7 May 2025 5:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 07 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | 30 टक्के परतावा देईल टाटा पॉवर स्टॉक, स्वस्तात मिळतोय, संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | एक-दोन नव्हे! तब्बल 43 टक्के परतावा मिळेल, फक्त 82 रुपयांचा शेअर खरेदी करा - NSE: NHPC IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC IREDA Share Price | मंदीत संधी, स्वस्त झालेला शेअर देईल 55 टक्के परतावा, अशी संधी सोडू नका - NSE: IREDA BEL Share Price | 23 टक्के अपसाईड कमाई करा, अशी संधी सोडू नका; टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
x

Property Buy Sale | घर खरेदी करा अथवा घर विका, त्यापूर्वी या गोष्टी माहिती नसतील तर पैसा वाया गेलाच समजा

Property Sale Or BUY

Property Buy Sale | घर किंवा एखादी मालमत्ता खरेदी करताना त्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. मात्र अनेकांना या विषयी पुरेशी माहिती नसल्याने मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतो. त्यात त्यांना विविध कागदपत्रे तसेच पैशांची फसवणूक या गोष्टींचा सामना करावा लगतो. त्यामुळे घर किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करताना नेमकी कोणकोणती काळजी घ्यायला हवी या विषयी अधिक माहिती या बातमितून जाणून घेऊ.

प्रॉपर्टी टायटल
घर खरेदीच्या फसवणूकीत सर्वात मोठी फसवणूक ही अनेक गोष्टींची माहिती नसल्याने होते. त्यामुळे खरेदी आधी किंवा खरेदी करत असताना सल्लागाराची मदत घ्यावी. जेव्हा तुम्ही घर खरेगी करता तेव्हा त्याचे प्रॉपर्टी टायटल तपासून घ्यावे. यात तुमची फसवूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे जी व्यक्ती तुम्हाला मालमत्ता विकत आहे तिचेच नाव त्यावर आहे की नाही याची शहानीशा करुण घ्यावी.

हिडन चार्जेस
मालमत्ता खरेदी करताना मोठी रक्कम मोजावी लागते. यासाठी अनेक जण बॅंकेतून कर्ज घेत असतात. एक रकमी कर्ज घेउन ते समोरच्याला दिले की मालमत्ता आपल्या नावे होते असा अनेकांचा समज आहे. मात्र प्रत्यक्षात खरेदी करताना अनेक छुपे खर्च समोर येतात. या विषयी कोणताही विक्रेता सांगत नाही. यात रजिस्टेशन शुल्क, स्टॅंप ड्यूटी, इंस्पेक्शन शुल्क असे छुपे शुल्क आकारले जातात. त्यामुळे याची माहिती असणे महत्वाचे आहे.

सर्व कारभार लिखीत स्वरुपात असावा
अनेक व्यक्ती आपली मालमत्ता विकत असताना खरेदी करणा-या व्यक्तीला विविध डिस्कउंट किंवा विविध ऑफर आणि सुट मिळवून देण्याची आश्वासने देत असतो. मात्र जेव्हा प्रत्यक्षात आपण खरेदी करतो तेव्हा काही व्यक्ती या सर्व देयांवर पाठ फिरवतात. त्यामुळे तुम्हाला देखील अशी आश्वसने मिळाली असतील तर त्याच क्षणी ती लिखीत स्वरुपात ठेवा.

मार्केट रक्कम पाहा
घर खरेदी करताना तुम्हाला मालक घराचे जास्त पैसे सांगत असेल मात्र तो थोडी वाटाघटी करण्यास तयार असेल तर घरांच्या किंमती विचारात घ्या. यासाठी आजूबाजूच्या घराच्या किंमती काढण्यापेक्षा मार्केट रेट सध्या काय आहे हे तपासा.

ऑक्युपेशन सर्टिफीकेट
जर तुम्ही एखाद्या बिल्डर कडून घर खरेदी करत असाल तर त्याच्याकडे ऑक्युपेशन सर्टिफीकेट मागा. यात तुम्हाला विविध गोष्टींची माहिती मिळेल. जसे की, कंस्ट्रक्शनला मिळालेली मंजूरी, पाणी, वीज इत्यादी सुविधांची मंजूरी या गोष्टी नमुद असतात.

सेल्स वॅल्यू
कोणतीही मालमत्त खरेदी केल्यावर आपण तिथे किती दिवस राहणार आहेत हे अगदीच निश्चीत नसते. त्यामुळे त्याची सेल्स वॅल्यू पाहावी. जर तुम्ही एक इन्वेस्टमेंट म्हणून या कडे पाहत असाल तर तुम्ही सेल्स वॅल्यू १० वर्षांनी किती असणार आहे याची माहिती मिळवली पाहिजे.

रियल इस्टेटची मदत घ्यावी
रियल इस्टेटमध्ये तुमचे थोडे जास्तीचे पैसे जातात त्यामुळे अनेक जण स्वत:च सर्व काही करण्याचा निर्णय घेतात. मात्र रियल इस्टेटच्या मदतीने तुमचा व्यवहार सोपा होतो. पैसे कसे वाचवायचे हे ते लोक सांगतात. तसेच कोणतीही फसवणूक होण्याची शक्यता कमी असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Property Buy Sale Follow these rules while buying a house or else it will be a loss 03 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Property Sale Or BUY(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या