
Property Registration | कोरोना महामारी नंतर घर खरेदी जरा मंदावली होती. या वर्षी पुन्हा एकदा घर, जमिन खरेदीला वेग आल्याचे नाइट फ्रॅंक ऐसे मालमत्ता सल्लागार कंपनीने त्यांच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे घर खरेदीला आलेला वेग पाहून यातील गुंतवणूक वाढल्याचे दिसत आहे. तुम्ही देखील जमिन किंवा घर खरेदीचा विचार करत असाल तर या महत्वपूर्ण गोष्टी तुम्हाला माहित असल्याच पाहीजेत.
प्रथम मालकाची माहिती घ्या
जमिन खरेदी करताना तिच व्यक्ती या जमिनीची खरी मालक आहे का हे सर्वात आधी तपासावे. यात तुम्ही तुमच्या सोईमे वकिल अथवा व्यवसायीक किंवा सल्लागाराची मदत घ्यावी. विक्री डीड आणि मालमत्ता कराची पावती या सर्व गोष्टी वकिलाकडूनच तपासून घ्याव्यात. यासाठी तुम्ही मागील ३० वर्षांचा डाटा मागवू शकता.
पब्लिक नोटीस जाहिर करावी
जर तुम्ही पब्लीक नोटीस जारी केली तर याचा तुम्हाला फायदा होईल. यात तुम्हाला स्थानिक वृत्तपत्रांना जाहिरात द्यावी लागेल. त्यामुळे जर त्य जमिनीवर वाद असतील किंवा ती इतर कुणाच्या मालकीची असेल तर ती व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल. यात थर्ड पार्टी असल्यास त्याचाही खुलासा होईल.
पॉवर ऑफ ऍटर्नी तपासा
अनेकदा पॉवर ऑफ ऍटर्नी मार्फत जमिन खरेदी केली जाते. त्यामुळे फसवणूक होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. यात विकत घेत असलेल्या मालमत्तेच्या सत्यतेबाबत पडताळणीसाठी व्यवसायीकांची मदत नक्की घ्या. ही एक खुप मोठी प्रक्रीया आहे. यात तुमच्याकडे अनेक पुरावे मागितले जातात.
नोंदणी करण्यापूर्वी ही कागदपत्रे आवश्य तपासा
टायटल डीड –
म्हणजे जी जमिन तुम्हाला खरेदी करायची आहे ती जी व्यक्ती विकत आहे तिच्याच नावे आहे हे तपासावे.
एनओसी –
तुम्ही जमिन खरेदी केल्यावर तुम्हाला एनओसी मिळते. यात असा उल्लेख असतो की, या जमिनीचा इतर कोणत्याही व्यवसायीकाशी संबंध नाही.
कर पावत्या स्वत:कडे घ्या –
प्रत्येक मालमत्तेचा दर वर्षी कर भरावा लागतो. त्यामुळे त्याच्या कर पावत्या देखील घ्या.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.