
PSU Stocks | बीपीसीएल म्हणेजच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही महारत्न दर्जा असलेली कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची तयारी करत आहे. बीपीसीएल कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवार दिनांक 9 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. ( भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी अंश )
या बैठकीत कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा करू शकते. बीपीसीएल कंपनीची बोनस शेअर्स वाटप करण्याची ही पाचवी वेळ असेल. बीपीसीएल कंपनीचे शेअर्स मंगळवारी 504.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज बुधवार दिनांक 8 मे 2024 रोजी बीपीसीएल स्टॉक 1.68 टक्के वाढीसह 614.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
बीपीसीएल कंपनीने यापूर्वी 4 वेळा बोनस शेअर्स वाटप केले होते. जुलै 2017 मध्ये या कंपनीने 1:2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. तसेच जुलै 2016 आणि जुलै 2012 मध्ये या कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते.
या कंपनीने डिसेंबर 2000 मध्ये देखील आपल्या गुंतवणुकदारांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. ज्या गुंतवणूकदारांनी 2000 साली भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांना 7590 शेअर्स मिळाले होते. 12 मे 2000 रोजी बीपीसीएल कंपनीचे शेअर्स 13.17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2000 ते 2024 या काळात बीपीसीएल कंपनीने बोनस शेअर्स वाटप केले होते, त्यांची संख्या जोडली तर एकूण शेअर्सची संख्या 91080 शेअर्स होते. 7 मे 2024 रोजी बीपीसीएल कंपनीचे शेअर्स 604.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. म्हणजेच या किमतीनुसार 91080 शेअर्सचे एकूण मूल्य 5.50 कोटी रुपये झाले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.