12 December 2024 1:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Credit Card Repayment | तुम्हाला क्रेडिट कार्डच्या कर्जात अडकायचे नसल्यास हे लक्षात ठेवा, अन्यथा ट्रॅप घट्ट बसलाच समजा

Credit card repayment

Credit Card Repayment | आजच्या काळात, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर डिस्काउंट सेल सुरू आहे. दरम्यान, या कंपन्या सण किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेष ऑफर देतात. ज्यामध्ये क्रेडिट कार्डधारकांना बंपर सूट दिली जाते. अशा परिस्थितीत, सहसा असे दिसून येते की आपण सवलत किंवा स्वस्त ऑफर्सच्या आमिषात क्रेडिट कार्ड वापरून जास्त खरेदी करतो. छोट्या वस्तूंपासून ते मोठ्या वस्तूंपर्यंत, या ऑफरमुळे आपल्याला खर्चाचे भान राहत नाही. नंतर क्रेडिट कार्डची भले मोठे बिले भरण्यात अडचणी येतात. असे अनेक ग्राहक असतात जे या स्पेशल सेल ऑफरमुळे क्रेडिट कार्डच्या कर्जाच्या जाळ्यात अडकतात. तथापि, जर तुम्हीही अश्याच ऑफर्स च्या अमिषात पडून क्रेडिट कार्डच्या कर्जात अडकले असाल तर घाबरू नका, त्यातून बाहेर पडण्याचा एक जबरदस्त आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कर्जातून मुक्त होण्यासाठी :
क्रेडिट कार्डच्या कर्जातून मुक्त होण्यासाठी, तुम्हाला कर्ज परतफेडीचे ध्येय आणि त्यासाठी आर्थिक धोरण तयार करावे लागेल. यामध्ये चार गोष्टी समजून घ्या. प्रथम, जर तुमची बचत चांगली असेल, तर देय रकम जास्त भरा. यामुळे तुमची परतफेड क्षमता वाढेल. दुसरे म्हणजे कधीही कर्ज फेडताना तुम्ही प्रथम लहान कर्ज फेडले पाहिजे. यामुळे तुमचे लहान कर्ज लवकर फिटतील.

कर्ज परतफेडीसाठी धोरण तयार करा :
कर्ज परतफेड धोरण म्हणजे तुमची क्रेडिट मर्यादा वैयक्तिक कर्जात रूपांतरित करणे आणि सुलभ हप्त्यांमध्ये पैसे देणे. सामान्यत: वैयक्तिक कर्जावरील व्याजदर हे क्रेडिट कार्डच्या थकबाकीवरील व्याजदरापेक्षा कमी असतात, तर याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. तुम्ही क्रेडिट कार्ड पेमेंट वेळेवर करणे विसरू नका, त्यासाठी स्वयंचलित पेमेंट सेवा सेट करून घ्या. सर्व बँके ही सेवा देतात. कोणतेही पेमेंट उशिरा होणार नाही, याची काळजी घ्या.

कर्ज एका खात्यात आणा :
क्रेडिट कार्डचे एकापेक्षा जास्त पेमेंट देय असल्यास, कर्जाचे एकत्रीकरण करणे कधीही सुलभ आहे. म्हणजेच, सर्व क्रेडिट कार्ड पेमेंट एकाच खात्यातून केले जाऊ शकतात. याचा अर्थ असा की तुम्ही प्रत्येक क्रेडिट कार्डसाठी वेगवेगळे पेमेंट करण्याऐवजी एकाच खात्यातून पेमेंट करू शकता.

बँक किंवा कंपनीशी बोला :
क्रेडिट कार्डच्या कर्जातून बाहेर पडण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे सक्रिय दृष्टीकोन ठेवणे. सर्वात आधी क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँक किंवा कंपनीकडून माहिती घ्या की तुम्हाला परतफेडीच्या अटींमध्ये कशी आणि किती सूट मिळू शकते. थकबाकीचे बिल खूप जास्त असल्यास, बहुतेक बँका त्यासाठी तुम्हाला सोपे मार्ग सुचवतात.

खर्च कमी करा :
क्रेडिट कार्डचे कर्ज तुमच्या आर्थिक जीवनावर परिणाम करत आहे, असे वाटल्यास तुम्ही तुमचा खर्च नियंत्रणात आणला पाहिजे. तुम्हाला पगार मिळताच, सर्वप्रथम क्रेडिट कार्डची थकबाकी भरण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्ही डिफॉल्टर यादीत जाणार नाही. त्यानंतर शिल्लक रकमेतून महिन्याचे बजेट बनवा आणि खर्च भागवा. खर्चा करण्यापूर्वी कर्ज थकबाकी देऊन टाकण्याची रणनीती खूप प्रभावी आहे. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर देखील सुधारेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Credit card repayment burden to not get default on 13 August 2022.

हॅशटॅग्स

#Credit Card Repayment(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x