
PTC India Share Price | पीटीसी इंडिया कंपनीने आपल्या शेअर धारकांना आर्थिक वर्ष 2022-2023 च्या शेवटच्या तिमाहीसाठी प्रति इक्विटी शेअर 5.80 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने सोमवार दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा अंतिम लाभांश 2 रुपये प्रति शेअर या अंतरिम लाभांश व्यतिरिक्त असेल. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PTC India Share Price | PTC India Stock Price | BSE 532524 | NSE PTC)
अंतरिम लाभांश व्यतिरिक्त अंतिम लाभांश :
30 डिसेंबर 2022 रोजी पार पडलेल्या पीटीसी इंडिया कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत म्हणजेच AGM मध्ये शेअर धारकांना अंतिम लाभांश वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. पीटीसी इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव के मिश्रा यांनी माहिती दिली आहे की,” पीटीसी इंडिया कंपनी ग्लोबल टेक कंपन्यांच्या मदतीने ग्रीन हायड्रोजन, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये नवीन व्यापारी संधीचा शोध घेत आहे. लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख कंपनीने अजून जाहीर केली नाही.
कंपनीची कामगिरी थोडक्यात :
मागील एक वर्षात पीटीसी इंडिया कंपनीने आपल्या शेअर धारकांना निराश केले आहे. या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल 23 टक्क्यांपेक्षा जास्त पडझड पाहायला मिळाली होती. तथापि ज्या लोकांनी 6 महिन्यांपूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्या लोकांना सध्या नफा मिळत आहे. मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 9 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मंगळवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी पीटीसी इंडिया कंपनीचे शेअर्स 0.88 टक्के वाढीसह 85.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच ट्रेडिंग सेशनमध्ये पीटीसी इंडिया कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर 4.06 टक्क्यांच्या वाढीसह 84.50 रुपयांवर ट्रेड करत होते. पीटीसी इंडिया कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 114.90 रुपये होती, तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 67.50 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.