
Public Provident Fund | सरकारी योजना गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि हमखास परतावा देणाऱ्या मानल्या जातात. या सरकारी योजना आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ काळात अप्रतिम परतावा कमावून देतात. सरकारी योजना आपल्या गुंतवणूकदारांना कर सवलत आणि इतर फायदेही देतात. सरकारी योजनांवर भारत सरकारची सुरक्षा हमी असते, म्हणून या योजना अल्प गुंतवणूकीवर चांगला परतावा देतात आणि, या योजनेतील गुंतवणूक कधीही बुडत नाही. चला तर मग आज या लेखात आपण अशाच एका योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, जी अल्प गुंतवणूकीवर करोडो रुपये परतावा देऊ शकते.
करोड रुपये परतावा :
1 कोटी रुपयेचा फंड तयार करण्यासाठी तुम्हाला दीर्घ काळ नियमित गुंतवणुक करावी लागेल. PPF योजनेत 25 वर्षांसाठी नियमित गुंतवणूक करून तुम्ही एक कोटी रुपये परतावा सहज कमवू शकता. नियमित गुंतवणूक केल्यास तुम्हाला PPF योजना तुमच्या गुंतवणूक रकमेवर 65 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज देईल. PPF योजनेत दरमहा गुंतवणूक केल्यास चक्रवाढ पद्धतीने व्याज परतावा दिला जातो. PPF योजनेत पैसे जमा केल्यास तुम्हाला कर सवलत मिळते. PPF मध्ये गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा रक्कम 1.5 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
PPF योजना थोडक्यात :
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही योजना PPF या नावाने प्रसिद्ध आहे. PPF योजनेतील गुंतवणुकीवर वार्षिक 7.1 टक्के दराने व्याज परतावा मिळतो. PPF योजनेत गुंतवणूक करण्याची किमान रक्कम मर्यादा 500 रुपये आणि कमाल रक्कम मर्यादा 1.5 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. PPF योजनेत गुंतवणूक केल्यास वार्षिक चक्रवाढ पद्धतीने रिटर्न्स मिळतात. सरकार दर तिमाही कालावधीत PPF योजनेतील व्याज दराचे पुनर्विलोकन करते. PPF योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाणून खाते उघडू शकता. PPF योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे निश्चित करण्यात आला आहे, परंतु तुम्ही त्यात दर 5-5 वर्षांनी वाढ करु शकता.
करोडो रुपये कमावण्याचा हिशोब :
जर तुम्ही PPF योजनेत दरमहा 12,500 रुपये जमा केले तर, 12 महिन्यांत तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक रक्कम 1.50 लाख रुपये जमा होईल. PPF कॅल्क्युलेटरनुसार गणना केल्यास PPF मध्ये दरमहा 12500 रुपये जमा केल्यास 15 वर्षात तुम्हाला 40.68 लाख रुपये परतावा मिळेल. यामध्ये 22.50 लाख रुपये तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक असेल आणि त्यावर तुम्हाला व्याज लेतवा म्हणून 18.18 लाख रुपये मिळेल.
या गुंतवणूकीचा कालावधी तुम्ही आणखी 5-5 वर्ष असा दोन वेळा वाढवला, तर तुमच्या गुंतवणूकीचा एकूण मॅच्युरिटी कालावधी 25 वर्षे होईल. त्यानुसार तुमच्या गुंतवणुकीवर 7.1 टक्के व्याज दराने तुम्हाला 1 कोटी 03 लाख 08 हजार 15 रुपये परतावा मिळेल. या 25 वर्षाच्या गुंतवणुक कालावधीत तुमची एकूण गुंतवणूक रक्कम 37.50 लाख रुपये जमा होईल, आणि त्यावर तुम्हाला 65 लाख 58 हजार रुपये व्याज परतावा मिळेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.