14 December 2024 6:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Money From IPO | IPO असावा तर असा! रातोरात पैसे डबल, लिस्टिंगच्या काही दिवसात107% परतावा, आता खरेदी करणार?

Money From IPO

Money From IPO | शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या बद्दल गुंतवणूकदारांना फारशी माहिती नसते. मात्र या कंपन्या कमालीचे प्रदर्शन करत असतात. अशा कंपनीच्या शेअर्सची चर्चा फार कमी होते. टेक्नोपॅक पॉलिमर ही अशीच एक कंपनी आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 16 टक्क्यांच्या वाढीसह या कंपनीच्या शेअर्सने बीएसई निर्देशांकावर 114 रुपयांची किंमत पातळी स्पर्श केली होती. हा SME कंपनीचा स्टॉक 16 नोव्हेंबर 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. आता मात्र या कंपनीच्या शेअरने आपली सर्वोच्च किंमत पातळी स्पर्श केली आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
Technopack Polymers कंपनीचे शेअर्स बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून आतपर्यंत 107 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. ज्या गुंतवणूकदाराने IPO इश्यू किमतीवर या स्टॉकमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून दुप्पट झाले आहे. Technopack Polymers कंपनीची IPO इश्यू किंमत 55 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. टैक्नोपॅक पॉलिमर्स ही कंपनी मुख्यतः FMCG पॅकेजिंगसाठी प्लास्टिक आणि पेपर उत्पादने बनवते. ही कंपनी आपल्या उद्योग क्षेत्रात आघाडीची कंपनी म्हणून ओळखली जाते. टेक्नोपॅक पॉलिमर्स कंपनी आपल्या ग्राहकांसाठी एचडीपीई कॅप्स आणि इतर उच्च दर्जाचे प्लास्टिक पॅकेजिंग सोल्यूशन्स निर्मिती करते. या कंपनीने 25 नोव्हेंबर 2022 रोजी स्टॉक एक्सचेंजला कळवले आहे की, त्यांनी 10.88 कोटी रुपये मूल्याची Sacmi Imola SC Beverages Cap Line उत्पादनाची ऑर्डर दिली आहे.

SME IPO थोडक्यात :
एसएमई आयपीओ हा झटपट पैसा कमावण्याचा एक मार्ग आहे. या SME IPO मध्ये लघु व मध्यम उद्योग करण्याऱ्या कंपन्या आपले शेअर्स विकून भांडवल उभारणी करतात. ज्या कंपन्या SME अंतर्गत आपला IPO शेअर बाजारात आणतात, त्या कंपन्या BSE SME किंवा NSE इमर्ज प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जातात. SME अंतर्गत IPO आणण्यासाठी कंपनीचे पोस्ट इश्यू कॅपिटल 1 कोटी ते 25 कोटी रुपयेच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Technopack Polymers Share has listed on stock market and investors has earned huge Money From IPO on 1 December 2022.

हॅशटॅग्स

Money From IPO(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x