
Rail Vikas Nigam Share Price | मागील बऱ्याच दिवसापासून ‘रेल विकास निगम लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स चर्चेचा विषय बनले आहेत, कारण कंपनीला ‘गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ कडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. ही बातमी कन्फर्म होताच RVNL कंपनीच्या शेअरमध्ये 4.37 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली होती. आज गुरुवार दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी RVNL कंपनीचे शेअर्स 0.70 टक्के घसरणीसह 77.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील वर्षी या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Rail Vikas Nigam Share Price | Rail Vikas Nigam Stock Price | RVNL Share Price | RVNL Stock Price | BSE 542649 | NSE RVNL)
रेल विकास निगम स्टॉक तेजीत :
रेल विकास निगम कंपनीच्या शेअर्सने 2023 या नवीन वर्षात आतापर्यंत 13 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. कालच्या किंचित तेजीनंतर शेअरमध्ये पुन्हा तेजीचा कल पाहायला मिळत आहे. RVNL स्टॉक आज NSE निर्देशांकावर 77.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. आज स्टॉक विकली एक्सपायरी असल्यामुळे शेअरमध्ये थोडा विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. किंबहुना शेअर धारकांनी आज प्रॉफिट बुकिंगला सुरुवात केली आहे.
RVNL शेअरची कामगिरी :
मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स 2023 या नवीन वर्षात मल्टीबॅगर परतावा देऊ शकतात, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. या कंपनीचे शेअर्स मागील तीन महिन्यांत 36.10 रुपयांवरून 77.85 रुपयांपर्यंत वधारले आहेत. त्याच वेळी मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरमध्ये 108 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. मागील 5 वर्षांत RVNL कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 300 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
IIFL सिक्युरिटीज फिरमने जाहीर केलेल्या अहवालानुसार, 2023 मध्ये रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स मल्टिबॅगर परतावा कमावून देऊ शकतात. ब्रोकरेज फर्मने RVNL कंपनीच्या शेअर्ससाठी 130 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. पुढील एका वर्षात RVNL स्टॉक आपली लक्ष किंमत स्पर्श करेल, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. याशिवाय शेअर बाजारातील अनेक तज्ज्ञ RVNL स्टॉक बाबत सकारात्मक असून त्यांनी शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.