8 October 2024 8:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | SBI च्या 'या' फंडामुळे गुंतवणूकदारांची रोज दिवाळी, पैसा 4 पटीने वाढतोय, फायदा घ्या - Marathi News NBCC Share Price | PSU शेअरने 250 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा दिला, आता स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत अपडेट, मल्टिबॅगर शेअरवर होणार परिमाण, स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअर पुन्हा फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअर ओव्हरसोल्ड झोनच्या जवळ, 2800% परतावा देणारा शेअर BUY करावा की Sell - Marathi News IRFC Share Price | IRFC शेअर टेक्निकल चार्टवर 50% पुलबॅकचे संकेत, तज्ज्ञांनी दिला सल्ला, स्टॉक BUY करावा का - Marathi News Vedanta Share Price | रॉकेट तेजीचे धावणार वेदांता शेअर, FII आणि म्युच्युअल फंड कंपन्यांकडून खरेदी, ब्रोकरेज बुलिश - Marathi News
x

Railtel Share Price | तुफान तेजीतील रेलटेल कॉर्पोरेशन शेअर रुळावरून घसरला, पण ऑर्डरबुक मजबूत, तज्ज्ञ काय सांगतात?

Railtel Share Price

Railtel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या घसरणीसह 397.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 12750 कोटी रुपये आहे.

रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 460 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 96 रुपये होती. मागील काही दिवसांपासून रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स मंदीच्या गर्तेत अडकले आहेत. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअर्समध्ये सात टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे. आज सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी रेलटेल कॉर्पोरेशन स्टॉक 5.19 टक्के घसरणीसह 376.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील एका महिन्यात रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 13 टक्के परतावा कमावून दिला आहे. 11 जानेवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 397 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 376 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 113 रुपये या नीचांक किमतीवरून 251 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 171 रुपये या नीचांक किंमत पातळीवरून 132 टक्के वाढली आहे.

सेबीला दिलेल्या माहितीत कंपनीने कळवले आहे की, कंपनीला नुकताच भारतीय संरक्षण मंत्रालयाने 18.21 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. यासह रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 4800 कोटी रुपयेवर पोहोचला आहे. रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीला भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने OFC केबल टाकण्यासाठी आणि त्यांचे दुरुस्ती देखभाल करण्यासाठी 3 वर्षांचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. या कॉन्ट्रॅक्टचे एकूण मूल्य 18.21 कोटी रुपये आहे.

डिसेंबर तिमाहीच्या अखेरपर्यंत रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 4800 कोटी रुपये होता. रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीमध्ये भारत सरकारने 72.84 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. या कंपनीच्या शेअर्सने अल्प आणि दीर्घ मुदतीत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. तज्ञांनी घसरणीच्या काळात रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक दीर्घकाळात तुम्हाला मालामाल करू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Railtel Share Price NSE Live 12 February 2024.

हॅशटॅग्स

Railtel Share price(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x