15 December 2024 2:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Railtel Share Price | हा PSU शेअर मालामाल करतोय, शॉर्ट टर्म मध्ये 5 पट परतावा दिला, संधी सोडू नका

Railtel Share Price

Railtel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स मागील काही काळापासून जबरदस्त तेजीत वाढत आहेत. शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 14 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 596.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. दिवसभराच्या व्यवहारात या कंपनीच्या शेअर्सने 618 रुपये ही उच्चांक किंमत स्पर्श केली होती. गुरुवार दिनांक 11 जुलै रोजी रेलटेल कॉर्पोरेशन स्टॉक 519.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 136 रुपये होती. ( रेलटेल कॉर्पोरेशन कंपनी अंश )

मागील 6 महिन्यांत रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्केपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 331 टक्के नफा कमावून दिला आहे. 12 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 138.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 12 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 596.80 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील 6 महिन्यांत या रेल्वे कंपनीच्या शेअर्सची किंमत 68 टक्के वाढली आहे.

मागील 2 वर्षात रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 537 टक्के वाढवले आहेत. 15 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 93.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. RailTel Corporation व्यतिरिक्त IRCON इंटरनॅशनल आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्येही जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे.

IRCON इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 5 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 336.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. दिवसभराच्या व्यवहारात या कंपनीच्या शेअर्सनी 349.40 रुपये ही उच्चांक किंमत स्पर्श केली होती. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 5.54 टक्क्यांच्या उसळीसह 217.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. दिवसभराच्या व्यवहारात या कंपनीच्या शेअर्सने 224.45 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Railtel Share Price NSE Live 13 July 2024.

हॅशटॅग्स

Railtel Share price(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x