
Railtel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीचे शेअर्स बुलेट ट्रेनच्या गतीने धावत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 13 टक्के वाढीसह 490 रुपये किमतीवर पोहचले होते. फेब्रुवारीमध्ये हा स्टॉक 491.45 रुपये या उच्चांक किमतीवर पोहचला होता. नुकताच या कंपनीला दक्षिण मध्य रेल्वे विभागाने 20 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत कंपनीला दक्षिण-मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागातील 523 RKM मध्ये IP-MPLS च्या दूरसंचार कामाशी संबंधित कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आहे. ( रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनी अंश )
शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया स्टॉक 9.49 टक्के वाढीसह 475.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीला नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर सर्व्हिसेसकडून 81.45 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आहे. जून महिन्यात आत्तापर्यंत रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीला तामिळनाडू फायबरनेट कॉर्पोरेशनकडून हेडएंड सिस्टीमचा पुरवठा, इंस्टॉलेशन, इंटिग्रेट चाचणी आणि कमिशनिंग तसेच ऑपरेशन आणि मेंटेनन्ससंबधित 24 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे.
रेलटेल कंपनीला Points of Presence च्या निर्मितीसाठी भारतीय संरक्षण मंत्रालयाकडून 11 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. या महिन्यात RailTel कंपनीवर अनेक ऑर्डर्सचा पाऊस पडला आहे. जून महिन्यात रेलटेल स्टॉक 15 टक्के मजबूत झाला होता. 2024 या वर्षात शेअरची किंमत 40 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 266 टक्के परतावा कमावून दिला होता. रेलटेल ही मिनीरत्न-1 दर्जा असलेली सरकारी कंपनी आहे. ही कंपनी भारतातील सर्वात मोठी दूरसंचार पायाभूत सुविधा प्रदान करणाऱ्या कंपन्यापैकी एक आहे. या कंपनीकडे संपूर्ण भारतात शहरी आणि ग्रामीण भागात विस्तृत ऑप्टिक फायबर नेटवर्क आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.