Rattan Power Share Price | हा शेअर श्रीमंत बनवणार! प्राईस 13 रुपये, 1 महिन्यात दिला 60% परतावा, खरेदी करा

Rattan Power Share Price | रतन इंडिया पॉवर कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. शनिवारच्या विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट करत होते. दिवसभराच्या व्यवहारा दरम्यान हा स्टॉक 13.93 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर पोहचला होता. मागील 4 दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किट हीट करत आहेत. ( रतन इंडिया पॉवर कंपनी अंश )

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षाच्या कालावधीत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 350 टक्के परतावा कमवून दिला आहे. शनिवार दिनांक 18 मे 2024 रोजी विशेष ट्रेडिंग सेशनमध्ये रतन इंडिया पॉवर स्टॉक 9.92 टक्के वाढीसह 13.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मे 2023 रोजी रतन इंडिया पॉवर स्टॉक 3.03 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. रतन इंडिया पॉवर कंपनीने 22 मे रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करतील. रतन इंडिया पॉवर कंपनीमध्ये प्रवर्तकानी 44.06 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

सार्वजनिक गुंतवणूकदारांनी कंपनीचे 55.94 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. RatanIndia Enterprises Limited कंपनीने 19.81 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर RR Imphaland Private Limited कंपनीने रतन इंडिया पॉवर कंपनीचे 24.25 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rattan Power Share Price NSE Live 20 May 2024.