
RattanIndia Power Share Price | रतन इंडिया पॉवर या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी हा स्टॉक 4 टक्के वाढून 17.50 रुपये किमतीवर पोहचला होता. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 16.83 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये जून 2024 तिमाहीच्या उत्कृष्ट निकालानंतर तेजी पाहायला मिळत आहे. ( रतन इंडिया पॉवर कंपनी अंश )
मागील काही वर्षांत रतन इंडिया पॉवर कंपनीचे शेअर्स 1 रुपयेवरून वाढून 17 रुपये किमतीवर पोहचले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 21.13 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 4.67 रुपये होती. शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी रतन इंडिया पॉवर स्टॉक 3.21 टक्के वाढीसह 17.35 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
जून तिमाहीत रतन इंडिया पॉवर कंपनीने 93 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 549.4 कोटी रुपये तोटा झाला होता. जून 2024 तिमाहीत या कंपनीचा महसूल वार्षिक आधारावर 10 टक्के वाढून 931.8 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत रतन इंडिया पॉवर कंपनीचा महसूल 847.3 कोटी रुपये नोंदवला गेला होता.
ऑपरेटिंग स्तरावर या कंपनीचा EBITDA जून 2024 तिमाहीत वार्षिक आधारावर 20 टक्के वाढून 188.6 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीचा EBITDA 156.8 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील 5 वर्षात रतन इंडिया पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. 30 ऑगस्ट 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स 1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 17.50 रुपये किमतीवर पोहचला होता.
मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1640 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 250 टक्के वाढली आहे. 2 ऑगस्ट 2023 रोजी हा स्टॉक 4.96 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 17.50 रुपये किमतीवर पोहचला आहे. 2024 या वर्षात रतन इंडिया पॉवर स्टॉक 90 टक्क्यांनी वाढला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.