 
						RBL Bank Share Price | ‘आरबीएल बँक’ या खाजगी क्षेत्रातील मोठ्या बँकेने नुकताच आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाही काळात आरबीएल बँकेच्या निव्वळ नफ्यात 37 टक्क्यांची वाढ झाली असून बँकेने 271 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. 2022-23 या संपूर्ण आर्थिक वर्षात आरबीएल बँकेने 883 कोटी रुपये कमाई केली आहे. मागील आर्थिक वर्षात याच तिमाही काळात आरबीएल बँकेला 75 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. त्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापन मंडळात काही फेरबदल ही पाहायला मिळाले होते.
जानेवारी–मार्च 2023 या तिमाही काळात आरबीएल बँकेचे मूळ निव्वळ व्याज उत्पन्न 7 टक्क्यांच्या वाढीसह 1,211 कोटी रुपयेवर पोहचले होते. आरबीएल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ‘आर सुब्रमण्यकुमार’ यांनी माहिती दिली की, बँकेची निव्वळ व्याज उत्पन्नातील वाढ मर्यादित असून, या तिमाहीत इतर उत्पन्न 32 टक्क्यांच्या वाढीसह 674 कोटी रुपयेवर पोहचले आहे.
मागील एका आठवड्यात आरबीएल बँकेच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 10 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील.एका महिन्यात या बँकेचा शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. आणि महिला एका वर्षात या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 34 टक्के परतावा कमावून दिला आहे . मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरबीएल बँकेचे शेअर्स 1.35 टक्के वाढीसह 161.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		