
Refex Share Price| मागील काही वर्षांत रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षांत रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 8500 टक्के परतावा कमावून दिला आहे.
जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 8.5 लाख रुपये झाले असते. आज मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी रेफेक्स इंडस्ट्रीज स्टॉक 0.27 टक्के घसरणीसह 558.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मागील 5 वर्षात रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 3,533.46 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स खरेदी केले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 611 टक्के वाढले असते. मागील एका वर्षभरात रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 260 टक्के नफा मिळवून दिला आहे.
जर तुम्ही सहा महिन्यांपूर्वी रेफेक्स इंडस्ट्रीज स्टॉक खरेदी केला असता, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 86 टक्के वाढले असते. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.64 टक्क्यांच्या घसरणीसह 589.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
रेफेक्स इंडस्ट्रीज ही एक स्मॉल कॅप कंपनी असून रीफ्रिजरंट गॅस रिफिल करण्याचे काम करते. ही कंपनी मुख्यतः क्लोरोफ्लुरोकार्बन्सला पर्याय उपलब्ध करून देते. सप्टेंबर 2023 तिमाहीत रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीमध्ये प्रवर्तकांचा वाटा 53.3 टक्के होता. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांचा वाटा 46.6 टक्के होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.