
Reliance Capital Share Price | कर्जबाजारी उद्योगपती ‘अनिल अंबानी’ यांच्या ‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनीच्या विक्री प्रक्रियेला उशीर होण्याचे संकेत मिळत आहेत. खरं तर ‘टोरेंट इन्व्हेस्टमेंट्स’ कंपनीने ‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनीच्या कर्जदात्याना कळवले आहे की, ते लिलावाच्या दुसऱ्या फेरीत भाग घेण्यास तयार नाहीत. या बातमीमुले ‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनीच्या शेअर मध्ये कमालीची पडझड पाहायला मिळत आहे. आज सोमवार दिनांक 27 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.06 टक्के घसरणीसह 8.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Reliance Capital Limited)
शेअरची कामगिरी :
जानेवारी 2008 मध्ये ‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनीचे शेअर्स 2770 रुपयांवर ट्रेड करत होते. 11 एप्रिल 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 23.30 रुपयांवर पोहचले होते. 1 मार्च 2023 रोजी ‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनीचे शेअर्स 7.85 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. यानंतर स्टॉकमध्ये घसरणीची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. ‘रिलायन्स कॅपिटल’ या कंपनीवर 40,000 कोटी रुपयांचे कर्ज असून ते न भरल्यामुळे कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे. या कंपनीच्या लिलावाची प्रक्रियाही सुरू झाली असून ‘टोरेंट इन्व्हेस्टमेंट्स’ आणि ‘हिंदुजा ग्रुप’ यानी सर्वात जास्त बोली लावली आहे.
लिलावाच्या मुदतवाढीला विरोध
तथापि लिलावाच्या मुदतवाढीला विरोध करत, ‘टोरंट इन्व्हेस्टमेंट्स’ कंपनीने RBI डेप्युटी गव्हर्नर ‘एम राजेश्वर राव’ यांना पत्र लिहून रिलायन्स कॅपिटलचे प्रशासक ‘नागेश्वर राव वाय’ यांना निर्देश देण्याची विनंती केली होती. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, आव्हान प्रक्रिया 21 डिसेंबर 2022 रोजी संपली असून कंपनीच्या प्रशासकाकडून ‘टोरेंट इन्व्हेस्टमेंट’ कंपनीला आलेल्या ईमेलने NPV बोलीची सर्वाधिक रक्कम 8,640 कोटी रुपये असल्याची घोषणा केली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.