14 December 2024 10:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Vodafone Idea Share Price | शेअरची किंमत 16 रुपये! तज्ज्ञांनी शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर केली, फायदा घेणार?

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 112 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 127 टक्के परतावा कमावून दिला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 2.7 टक्क्यांच्या वाढीसह 16.34 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

या कंपनीचे शेअर्स 18.42 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवरून 12.70 टक्के कमजोर झाले आहे. 2015 मध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 118 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या उच्चांक किमतीवरून शेअर 85 टक्के खाली पडला. आज मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 0.63 टक्के वाढीसह 16.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टेक्निकल चार्टवर व्होडाफोन आयडिया स्टॉक सकारात्मक वाढीचे संकेत देत आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये 15.55-14.50 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. प्रभुदास लीलाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, शेअरमध्ये आणखी वाढ पाहायला मिळू शकते. या ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया स्टॉकवर 17.60 रुपये ते 19.80 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. डिसेंबर 2023 पर्यंत कंपनीच्या प्रवर्तकांकडे कंपनीचे 50.36 टक्के भाग भांडवल होते.

व्होडाफोन आयडिया कंपनीचे, सीईओ अक्षय मुंद्रा यांनी एका निवेदनात माहिती दिली की, “कंपनीने ऑगस्ट 2023 मध्ये खुलासा केला होता की कंपनीचे प्रवर्तक कंपनीला पुढील काळात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आर्थिक मदत करणार आहेत. कंपनीचे पेमेंट दायित्वे आणि वचनबद्धता अजूनही प्रलंबित आहेत. यासाठी कंपनीच्या प्रवर्तकांनी पुढाकार घेऊन कंपनीला आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे”.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 20 February 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x