 
						Reliance Capital Share Price | हिंदुजा ग्रुपने रिलायन्स कॅपिटल कंपनीचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी हिंदुजा ग्रुप 1 बिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 8,200 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. यासाठी हिंदुजा ग्रुपने ग्लोबल क्रेडिट फंड उभारणीची घोषणा केली आहे. अनिल अंबानी यांची रिलायन्स कॅपिटल ही कंपनी दिवाळखोरीच्या प्रक्रियेला तोंड देत आहे. आणि हिंदुजा समूहाने सर्वाधिक बोली लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
एका मीडिया रिपोर्टनुसार कायदेशीर समस्या आणि अधिग्रहणासाठी न्यायालयाची मंजुरी मिळण्यासाठी आणि वित्तपुरवठ्यासाठी किमान तीन ते कमाल सहा महिने कालावधी जाईल. आणि वित्तपुरवठादारांची अंतिम मुदत बदलू शकते. कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या कर्जदात्यांनी हिंदुजा ग्रुपची कंपनी इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स यांच्या संकल्प योजनेच्या बाजूने मतदान करून आपला कौल नोंदवला.
इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स कंपनीने बोलीच्या दुसऱ्या फेरीत सर्वाधिक म्हणजेच 9,661 कोटी रुपये रोख ऑफर जाहीर केली होती. रिलायन्स कॅपिटल कंपनीचे प्रशासकानी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या मुंबई खंडपीठासमोर IIHL चा ठराव मांडणार असल्याची माहिती दिली होती. ही संकल्प योजना सादर करण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2023 निश्चित करण्यात आली आहे.
रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअर्सची ट्रेडिंग 7 जुलै 2023 पासून बंद ठेवण्यात आली आहेत. कंपनीच्या शेअरची किंमत सध्या 11.9 रुपये किमतीवर स्थिर झाली आहे. या वर्षी YTD आधारे रिलायन्स कॅपिटल स्टॉक 35.15 टक्के वाढला होता. मागील पाच वर्षांत रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअरची किंमत 96.76 टक्के घसरली आहे. एकेकाळी हा स्टॉक 367 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		