12 December 2024 7:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
x

Cyient DLM Share Price | पैशाचा पाऊस पडला! सायंट डीएलएम IPO शेअरने अवघ्या 3 दिवसात 100 टक्के परतावा दिला, डिटेल्स पाहा

Cyient DLM Share Price

Cyient DLM Share Price | सायंट डीएलएम या इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सेवा आणि सोल्यूशन्स प्रदान करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना जोरदार कमाई करून दिली आहे. 10 जुलै 2023 रोजी हा कंपनीचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध करण्यात आले होते. (Cyient Share Price)

अवघ्या 3 दिवसांत सायंट डीएलएम कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच कंपनीच्या आयपीओमध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांचे पैसे १५ दिवसांत दुप्पट वाढले आहेत. या कंपनीचे शेअर्स लिस्टिंगनंतर 265 रुपयेवरून वाढून 547 रुपयेवर पोहोचले आहेत. आज गुरूवार दिनांक 13 जुलै 2023 रोजी सायंट डीएलएम कंपनीचे शेअर्स 0.55 टक्के घसरणीसह 515.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सायंट डीएलएम कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 265 रुपये निश्चित करण्यात आली होती. 10 जुलै 2023 रोजी सायंट डीएलएम कंपनीचे शेअर 51 टक्क्यांच्या वाढीसह 401 रुपये किमतीवर सूचीबद्ध करण्यात आले होते. सूचीबद्ध झाल्यापासून सायंट डीएलएम कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत.

बुधवार दिनांक 12 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9 टक्के वाढीसह 547 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सायंट डीएलएम कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 547 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4204 कोटी रुपये आहे.

सायंट डीएलएम कंपनीचा IPO 71 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. सायंट डीएलएम कंपनीच्या IPO मध्ये राखीव ठेवण्यात आलेला रिटेल कोटा 52.17 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. तर गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 47.75 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्ससाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 95.87 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. IPO पूर्वी सायंट डीएलएम कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 92.84 टक्के भाग भांडवल धारण केले होते. आता हे प्रमाण 66.68 टक्के झाले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Cyient DLM Share Price today on 13 July 2023.

हॅशटॅग्स

Cyient DLM Share price|(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x