 
						Reliance Capital Share Price | कर्जबाजारी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या बहुतांश कंपन्या दिवाळखोरी प्रक्रियेला सामोरे जात आहेत. अशीच एक कंपनी आहे, रिलायन्स कॅपिटल. या फायनान्स क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स एकेकाळी 2700 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र नंतर या स्टॉकला उतरती कळा लागली.
मागील काही दिवसांपासून रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. अनेक वेळा रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअरची ट्रेडिंग देखील थांबवण्यात आली होती. आज बुधवार दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या शेअरमधील ट्रेडिंग रोखण्यात आली आहे.
12 सप्टेंबर 2023 रोजी एनसीएलटी मुंबई येथे रिलायन्स कॅपिटल कंपनीबाबत सुनावणी आयोजित करण्यात आली होती. एनसीएलटीने अद्याप हिंदुजा कंपनीच्या रिझोल्यूशन प्लॅनवर अंतिम निर्णय जाहीर केले नाहीये, याचे मुख्य कारण म्हणजे टोरेंट इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या याचिकेवर देण्यात आलेला आदेश ज्यात आयआयएचएलच्या रिझोल्यूशन प्लॅनला मंजुरी देण्याबाबत कमिटी ऑफ क्रेडिटर्स कमिटीने जो निर्णय घेतला होता, त्याला आव्हान देण्यात आले आहे.
टोरेंट कंपनीच्या याचिकेवर एनसीएलटीने आपला आदेश राखून ठेवला आहे. आता जो पर्यंत टोरंट कंपनीच्या याचिकेवर अंतिम निकाल लागत नाही, तोपर्यंत हिंदुजा कंपनीच्या रिझोल्यूशन प्लॅनला मंजूरी मिळण्याची शक्यता नाही.
हिंदुजा कंपनीच्या रिझोल्यूशन प्लॅनला RBI ची देखील मंजुरी मिळवणे आवश्यक आहे. NCLT ने आपला निर्णय पुढे ढकलण्याचे आणखी एक कारण म्हणजे, NCLT च्या अटीनुसार कर्जदात्याना अद्याप RBI आणि CCI कडून IIHL च्या रिझोल्यूशन प्लॅनला मंजुरी देण्यात आलेली नाही. याशिवाय ऑगस्ट 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने टोरेंट कंपनीच्या अर्जावर होणारी सुनावणी ऑक्टोबर 2023 पर्यंत पुढे ढकलली आहे. या केसमध्ये लिलावाच्या दुसऱ्या फेरीला आव्हान देण्यात आले होते.
अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाकडून या प्रकरणावर जोपर्यंत संपूर्ण स्पष्टता येत नाही, तोपर्यंत एनसीएलटी रिझोल्यूशन प्लॅनच्या मंजुरीवर अंतिम निर्णय देऊ शकत नाही. रिलायन्स कॅपिटल कंपनीचे अधिग्रहण करण्यासाठी IIHL ने दिलेल्या 10,000 कोटी रुपयेच्या रिझोल्यूशन प्लॅनला कर्जदात्यांच्या समितीने 29 जून 2023 रोजी 99.6 टक्के मतदानासह मंजुरी दिली होती. त्यानंतर ही योजना अंतिम मंजुरीसाठी एनसीएलटीकडे दाखल करण्यात आली, मात्र टोरेंट इन्व्हेस्टमेंट्स कंपनीने त्याविरोधात दावा दाखल केला, म्हणून आता अंतिम मंजुरी मिळण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		