2 May 2024 7:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

NIIT Share Price | मार्ग श्रीमंतीचा! एनआयआयटी शेअरमध्ये तुफान तेजी, 5 दिवसात डायल 65 टक्के परतावा, आजही 17% अप्पर सर्किट

NIIT Share Price

NIIT Share Price | एनआयआयटी लिमिटेड या शिक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान खरेदी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत ट्रेड करत होते. आणि अशीच तेजी मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पाहायला मिळाली होती. मंगळवारी एनआयआयटी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 19 टक्क्यांच्या वाढीसह 118.49 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

आज देखील या कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत धावत होते. मागील दोन ट्रेडिंग सेशनमध्ये NIIT कंपनीचे शेअर्स 35 टक्के वाढले आहेत. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 65 टक्के नफा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी एनआयआयटी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 17.39 टक्के वाढीसह 137.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 2 दिवसांपासून एनआयआयटी लिमिटेड कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. या कंपनीच्या स्टॉकमध्ये कोणतेही मोठे ट्रिगर नसताना स्टॉक वाढत आहे. मात्र एका सकारात्मक बातमीमुळे या कंपनीचे शेअर्स वाढत आहेत.

एनआयआयटी लिमिटेड कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, प्रॅक्टल अॅनालिटिक्स कंपनीचे सह संस्थापक आणि समूह सीईओ श्रीकांत वेलमाकन्नी यांना NIIT कंपनीच्या मुख्य व्यवस्थापन मंडळात सामील करण्यात आले आहेत. Fractal Analytics ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI कंपनी आहे.

मागील 10 वर्षात एनआयआयटी लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1720 टक्के परतावा कमावून दिला आहे. याकाळात शेअरची किंमत 6.25 रुपयेवरून वाढून 115 रुपयेवर पोहचली आहे. मे 2023 मध्ये एनआयआयटी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 416.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ऑगस्ट 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स 77.06 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर आले होते.

जून 2023 च्या पहिल्या तिमाहीत एनआयआयटी लिमिटेड कंपनीने आपले आर्थिक निकाल जाहीर केले होते. या तिमाहीत कंपनीने 2.2 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी जून तिमाहीत एनआयआयटी लिमिटेड कंपनीला 4.5 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. NIIT कंपनीने जून 2023 तिमाहीत RPS कन्सल्टिंग कंपनीचे 10 टक्के शेअर्स ताब्यात घेतले आहे. आता RPS कन्सल्टिंग ही NIIT ची पूर्ण मालकीची उपकंपनी बनली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NIIT Share Price today on 13 September 2023.

हॅशटॅग्स

#NIIT Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x