 
						Reliance Capital Share Price Today | या पूर्ण आठवड्यात ‘रिलायन्स कॅपिटल लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सने कमालीची कामगिरी केली आहे. शेअर मध्ये बऱ्याच काळानंतर एवढी वाढ पाहायला मिळाली आहे. आज शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी गा कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के वाढीसह 9.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Reliance Capital Limited)
Reliance Capital Limited Stock Price Today on NSE & BSE
शेअर्समधील या तेजीचे कारण म्हणजे, कर्जबाजारी ‘रिलायन्स कॅपिटल लिमिटेड’ कंपनीच्या लिलावाच्या दुसऱ्या फेरीत ‘हिंदुजा समूह’ च्या IIHL ने 9,650 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावली आहे.
लिलावाचे तपशील :
‘इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड’ ने ‘रिलायन्स कॅपिटल लिमिटेड’ कंपनीच्या लिलावाच्या दुसऱ्या फेरीत 9,650 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावली आहे. लिलावाच्या पहिल्या फेरीत ‘टोरेंट इन्व्हेस्टमेंट’ कंपनीने 8,640 कोटी रुपयांची बोली लावली होती. यापेक्षा 1,000 कोटी रुपये जास्तची बोली हिंदुजा ग्रुपने लावली आहे. ‘टोरेंट इन्व्हेस्टमेंट्स’ आणि सिंगापूरची ‘ओकट्री’ या दोन कंपन्यांनी लिलावाच्या दुसऱ्या फेरीत सहभागी होण्याची ईच्छा व्यक्त केली होती, मात्र प्रत्यक्षात ते सामील झाले नाही.
रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या कमिटी ऑफ क्रेडिटर्सने लिलावाच्या दुसऱ्या फेरीकरिता 10,000 कोटी रुपये ही मूळ किंमत ठरवली होती. त्याच वेळी लिलावाच्या पहिल्या फेरीकरिता बोलीचे किमान मूल्य 9,500 कोटी रुपये ठरवण्यात आले होती.
IIHL ने ‘रिलायन्स कॅपिटल लिमिटेड’ कंपनी खरेदी करण्यासाठी 9,650 कोटी रुपयये पूर्ण रक्कम रोखीने देण्याची ऑफर दिली होती. सीओसीने किमान 8,000 कोटी रुपयांची आगाऊ रोख रक्कमची मागणी केली. लिलावाच्या पहिल्या फेरीत सर्वाधिक बोली टोरेंट ग्रुपने लावली होती. आणि त्यांनी आयआयएचएलच्या बोलीला कोर्टात आव्हान दिले होते.
मागील डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या पहिल्या फेरीत IIHL कंपनीने 8,110 कोटी रुपये बोली जाहीर केली होती, नंतर ती बदलून 9,000 कोटी रुपयेपर्यंत वाढवण्यात आली होती. अपेक्षित बोली न मिळाल्याने कंपनीच्या कर्जदात्यांनी लिलावाची दुसरी फेरी आयोजित करण्याची मागणी केली होती.
शेअरची आताची स्थिती :
‘रिलायन्स कॅपिटल’ कंपनीचे शेअर जानेवारी 2008 मध्ये 2770 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 7.60 रुपये होती. सध्या हा स्टॉक आपल्या उच्चांक किंमतीपासून 99 टक्के कमी झाला आहे. स्टॉकमध्ये अजूनही मंदी कायम असून गुंतवणुकदारांना नुकसान सहन करावा लागत आहे. रिलायन्स कॅपिटल कंपनी सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		