 
						Reliance Home Finance Share Price | एकेकाळी भारतातील अब्जाधीश लोकांमध्ये गणल्या जाणाऱ्या अनिल अंबानीं यांच्या अनेक कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत. प्रचंड कर्ज आणि इतर आर्थिक समस्यांमुळे अनिल अंबानींच्या बऱ्याच कंपन्यांचे शेअर्स 99 टक्केपेक्षा जास्त पडले आहेत.
अनेक वेळा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अचानक तेजी पाहायला मिळते, तर काही वेळा हे शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकलेले असतात. असाच एक पेनी स्टॉक आहे, रिलायन्स होम फायनान्स. गुरूवार दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी रिलायन्स होम फायनान्स स्टॉक 4.55 टक्के वाढीसह 3.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मागील काही दिवसांपासून रिलायन्स होम फायनान्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये 3.52 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 एप्रिल 2023 रोजी रिलायन्स होम फायनान्स कंपनीचे शेअर्स 3.97 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. तर 17 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.61 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
मागील तीन महिन्यांत रिलायन्स होम फायनान्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 85 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 71.28 टक्के वाढली आहे. मागील दोन आठवड्यात रिलायन्स होम फायनान्स कंपनीच्या गुंतवणूकदारांनी तब्बल 50 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावला आहे. एकेकाळी या कंपनीचे शेअर्स 110 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर या कंपनीच्या शेअरमध्ये उतरती कळा लागली आणि शेअरची किंमत 99 टक्के घसरली.
सप्टेंबर 2023 तिमाहीमध्ये रिलायन्स होम फायनान्स कंपनीने 99.78 टक्के घसरणीसह 0.16 कोटी रुपयेची निव्वळ विक्री नोंदवली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 72.27 कोटी रुपये निव्वळ विक्री नोंदवली होती. सप्टेंबर तिमाहीत रिलायन्स होम फायनान्स कंपनीला 067 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. तर कंपनीचा EBITDA 0.67 कोटी रुपये नकारात्मक पातळीवर गेला आहे. मागील वर्षी या कंपनीचा EBITDA 33.38 कोटी रुपये होता, जो आता 102.01 टक्के कमी झाला आहे. म्हणजेच कंपनीचा EBITDA सध्या 2.01 टक्के नकारात्मक आहे.
रिलायन्स होम फायनान्स कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे एकूण 0.74 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी कंपनीचे एकूण 99.26 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे. जून 2023 मध्ये रिलायन्स होम फायनान्स कंपनीच्या प्रवर्तकांकडे 43.61 टक्के भाग भांडवल होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांकडे कंपनीचे एकूण 56.30 टक्के भाग भांडवल होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		