
Reliance Industries Share Price | भारतातील सर्वात जास्त बाजार भांडवल असलेल्या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ आपल्या वित्त सेवा व्यासायला विलग करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने 2 मे 2023 रोजी क्रेडिटर आणि शेअर धारकांची बैठक आयोजित केली आहे. या दरम्यान ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स कमालीच्या तेजीत धावताना दिसले आहेत. शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 रोजी ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.31 टक्के वाढीसह 2,330.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Reliance Industries Limited)
बैठकीत प्रस्तावित निर्णय :
‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीने आयोजित केलेल्या बैठकीत आपला वित्तीय सेवा व्यवसाय वेगळा करण्याच्या योजनेवर चर्चा केली जाणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी आपला वित्त सेवा व्यवसाय ‘रिलायन्स स्ट्रैटेजिक इन्व्हेस्टमेंट्स’ विलग करणार आहे. हा वित्त व्यवसाय वेगळा केल्यावर तो ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस हा नावाने चालवला जाईल. त्यानंतर हा स्टॉक शेअर जबरत सूचीबद्ध केला जाणार आहे. ही संपूर्ण विलिनीकरण प्रक्रिया शेअर स्वॅप व्यवस्थेद्वारे पूर्ण केली जाणार आहे. ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअर धारकांना त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक शेअरवर ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस’ कंपनीचे काही शेअर्स वाटप करण्यात येतील.
31 मार्च 2022 रोजी ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीच्या वित्तीय सेवा व्यवसायाचे मूल्य 1387 कोटी रुपये होते. ‘केव्ही कामथ’ यांना नवीन कंपनीचे ‘बिगर कार्यकारी अध्यक्ष’ म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे. ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनी संचालक मंडळाने नोव्हेंबर 2022 मध्ये विलगीकरणाला मंजुरी दिली. सध्या ‘Jio Financial Services’ ही ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीच्या पूर्ण मालकीची उपकंपनी काम करत आहे.
ब्रोकरेज फर्म रिलायन्स कंपनीच्या शेअरबाबत उत्साही आहेत. ‘जेएम फायनान्शियल’ फर्मने ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकवर 2900 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. 29 एप्रिल 2022 रोजी ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 2,855 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 2,180 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.