 
						Reliance Industries Share Price Today | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींच्या यांच्या मालकीच्या ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले आहेत. RIL कंपनीने आर्थिक वर्ष 2023 च्या मार्च तिमाहीत 19,299 कोटी रुपये एवढा विक्रमी निव्वळ नफा कमावला आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या नफ्यात 19 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. RIL कंपनीच्या टेलिकॉम आणि रिटेल सेगमेंटमध्ये प्रचंड मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. (Reliance Industries Limited)
कॅपेक्स आणि कर्जाबाबत कंपनीचे प्रदर्शन खूप चांगले होते. O2C चा EBITDA 11 टक्के असून तो अपेक्षेपेक्षा चांगला मानला जात आहे. आज मंगळवार दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.087 टक्के घसरणीसह 2,355.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
कंपनीचे तिमाही निकालांचे तपशील :
आर्थिक वर्ष 2022-23 च्या मार्च तिमाहीत ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ कंपनीच्या निव्वळ नफ्यात 19 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीने मार्च तिमाहीत 19,299 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. हा आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही नफा असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
तेल आणि पेट्रोकेमिकल व्यवसाय उत्पन्नात कमालीची वाढ झाली असून रिटेल आणि टेलिकॉम व्यवसायाने देखील मजबूत नफा कमावला आहे. कंपनीचे उत्पन्न 2.8 टक्क्यांच्या वाढीसह 2.39 लाख कोटी रुपयेवर पोहचले आहेत. संपूर्ण आर्थिक वर्षात RIL कंपनीने 66,702 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
RIL कंपनीचा EBITDA वार्षिक आधारावर 22 टक्क्यांच्या वाढीसह 41,389 कोटी रुपयेवर पोहचला आहे. कंपनीच्या मुख्य व्यवसाय असलेल्या ऑइल रिफायनरी आणि पेट्रोकेमिकलचे करपूर्व उत्पन्न 14.4 टक्क्यांच्या वाढीसह 16,293 कोटी रुपयेवर पोहचले आहेत. रिलायन्स जिओ कंपनीचा प्रॉफिट 15.6 टक्क्यांच्या वाढीसह 4984 कोटी रुपयेवर पोहचला आहे. तर कंपनीच्या रिटेल क्षेत्रातील व्यवसायाचा नफा 13 टक्के वाढीसह 2415 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. RIL कंपनीवर सध्या अजिबात कर्ज नाही.
मोतीलाल ओसवाल फर्मचे मत :
ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी RIL कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 2800 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. सध्याच्या किमतीपेक्षा या लक्ष किंमत 19 टक्के अधिक आहे. ब्रोकरेज फर्म रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल्स व्यवसायाचे मूल्यांकन 7.5x EV/EBITDA वर करतात. त्याच वेळी, Telecom Arm Jio चा महसूल आणि EBITDA अनुक्रमे आर्थिक वर्ष 2023-25 मध्ये 10 टक्के आणि 14 टक्के CAGR वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ब्रोकरेज फर्मच्या मते जिओ बाबत दीर्घकालीन गुंतवणूकीचा दृष्टीकोन मजबूत आहे. पुढील टॅरिफ वाढ, 5G रोलआउट आणि ग्राहक संख्या वाढीचा जबरदस्त फायदा जिओ कंपनीला होणार आहे. त्याच वेळी, आर्थिक वर्ष 2023-25 मध्ये कंपनीचा किरकोळ व्यवसाय स्टँडअलोन महसूल आणि EBITDA अनुक्रमे 25 टक्के आणि 32 टक्के CAGR दराने वाढू शकतो.
ब्रोकरेज हाऊस जेफरीजचे मत :
ब्रोकरेज हाऊस जेफरीजने देखील RIL कंपनीच्या शेअरवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक 3,125 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्म म्हणते की कंपनीचा EBITDA तज्ज्ञांच्या अंदाजापेक्षा खूप चांगला नोंदवला गेला होता, तर O2C आणि Jio विभागांनी त्यात मजबूत वाढ केली आहे. सध्या RIL कंपनीचे मूल्यांकन आकर्षित असून स्टॉकमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
ब्रोकरेज हाऊस जेपी मॉर्गनचे मत :
ब्रोकरेज हाऊस जेपी मॉर्गनने आरआयएल कंपनीचे शेअर्स 2960 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते मजबूत O2C व्यवसायाने कंपनीचा PAT अंदाजापेक्षा जास्त वाढवला आहे. तर कंपनीचे कॅपेक्स सकारात्मक असून कंपनीवर कोणतेही कर्ज नाही.
ब्रोकरेज हाऊस CLSA :
ब्रोकरेज हाऊस CLSA ने RIL कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक 2,970 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते कंपनीचा Q4 मधील PAT अंदाजापेक्षा खूप चांगला नोंदवला गेला आहे. कर दर अपेक्षेपेक्षा कमी असल्याचा फायदा कंपनीला या तिमाहीत मिळाला असून EBITDA देखील अपेक्षेपेक्षा अधिक वाढला आहे. कंपनी किरकोळ क्षेत्रात व्यापार विस्तार वेगाने करत आहे. ब्रोकरेज फर्मने आर्थिक वर्ष 24/25 EPS अंदाज अनुक्रमे 3 टक्के आणि 4 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		