
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 293.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. ( रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
रिलायन्स इन्फ्रा कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कर्ज सेटलमेंट कराराच्या अटींनुसार रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने JC फ्लॉवर्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडला त्याच्या थकीत कर्जाचे आंशिक पेमेंट केले आहे. आज बुधवार दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 1.10 टक्के वाढीसह 293 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील 4 वर्षांत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3000 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 920 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 2 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 293.95 रुपये किमतीवर पोहोचले आहेत. मागील एका वर्षात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
3 एप्रिल 2023 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर 146.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 131:40 रुपये होती. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 30.33 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
27 मार्च 2020 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची गुंतवणूक असलेल्या रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 1.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2 एप्रिल 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 30.33 रुपये किमतीवर पोहचले होते. मागील एका वर्षात रिलायन्स पॉवर स्टॉक 191 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 57 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 33.10 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 9.95 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.