
Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा या अनिल अंबानी यांच्या कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत धावत आहेत. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 12 टक्के वाढीसह 216.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 99 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( रिलायन्स इन्फ्रा कंपनी अंश )
मागील 4 वर्षांत रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2230 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 308 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 143.70 रुपये होती. शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रा स्टॉक 10.95 टक्के वाढीसह 231 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
4 जानेवारी 2008 पासून ते आतापर्यंत रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 2230 टक्के वाढले आहेत. 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 7 ऑगस्ट 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 216.30 रुपये किमतीवर पोहचले होते. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 8475 कोटी रुपये आहे.
मागील 3 वर्षांत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 185 टक्के नफा कमावून दिला आहे. 6 ऑगस्ट 2021 रोजी अनिल अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स इन्फ्रा कंपनीचे शेअर्स 75.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 216.30 रुपये किमतीच्या पार गेला आहे.
मागील 2 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्समध्ये 43 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. 5 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 149.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 216.30 रुपये किमतीवर पोहोचला आहे. मागील 2 वर्षात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 80 टक्के वाढवले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.