
Reliance Power Share Price | मागील काही दिवसांपासून तेजीत धावणाऱ्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीत रिलायन्स पॉवर लिमिटेड कंपनीला 1,136.75 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रिलायन्स पॉवर कंपनीला 291.54 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 28.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी रिलायन्स पॉवर स्टॉक 4.86 टक्के घसरणीसह 27.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
या कंपनीच्या डिसेंबर तिमाहीतील आर्थिक निकालांनी गुंतवणूकदारांना जोरदार दणका दिला आहे. मागील एका वर्षापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. 16 मे 2008 रोजी या कंपनीचे शेअर्स 261.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर हा स्टॉकमध्ये प्रचंड घसरण झाली. मात्र काही महिन्यापासून शेअरमधे जोरदार खरेदी सुरू झाली होती, आणि शेअर 28.80 रुपये किमतीवर पोहचले होते.
मागील एका वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 140 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 33.10 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 9.05 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 10,976 कोटी रुपये आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर तिमाहीत कंपनीचे एकूण महसूल उत्पन्न किरकोळ वाढून 2,001.54 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 1,936.29 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. डिसेंबर तिमाहीत या कंपनीचा खर्च वाढून 3,179.08 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च 2,126.33 कोटी रुपये नोंदवला गेला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.