 
						Reliance Power Share Price | रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत घसरण पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या घसरणीसह 181.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर बुधवारी देखील या कंपनीचे शेअर्स 20 टक्के घसरणीसह 227.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
मागील 2 दिवसांत रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 36 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या घसरणीचा परिणाम रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये देखील पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 3.17 टक्के घसरणीसह 27.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
अनिल अंबानीं यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटसह 26.93 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर्स 15 टक्क्यांच्या लोअर सर्किटमध्ये अडकले होते. मागील एका वर्षात रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 125 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 34.35 रुपये होती.
नुकताच सुप्रीम कोर्टाने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला 8000 कोटी रुपयाचा दणका दिला आहे. लवादाने अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची उपकंपनी दिल्ली एअरपोर्ट मेट्रो एक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेडच्या बाजूने निकाल दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल रद्द केला आहे.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीनेने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी नुकसान भरपाईची रक्कम देण्यास बांधील नाही कारण DMRC आणि DAMEPL कडून रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला कोणतेही पैसे मिळालेले नाही.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		